राज्यस्तरीय समिती अध्यक्षपदी एस. के. माळी यांची निवड अकृषी विद्यापीठ : शिक्षकेतर पदाचे सेवाप्रवेश नियम समिती
By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:31+5:302015-07-10T23:13:31+5:30
सोलापूर : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या सेवा प्रवेश नियम बनविण्याच्या समिती अध्यक्षपदी सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव एस. के. माळी यांची निवड करण्यात आली, तर याच समितीवर सदस्यपदी उपकुलसचिव मलिक रोकडे यांची निवड झाली आहे.

राज्यस्तरीय समिती अध्यक्षपदी एस. के. माळी यांची निवड अकृषी विद्यापीठ : शिक्षकेतर पदाचे सेवाप्रवेश नियम समिती
स लापूर : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या सेवा प्रवेश नियम बनविण्याच्या समिती अध्यक्षपदी सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव एस. के. माळी यांची निवड करण्यात आली, तर याच समितीवर सदस्यपदी उपकुलसचिव मलिक रोकडे यांची निवड झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे तत्कालीन कुलसचिव डॉ. धनराज माने यांच्या अध्यक्षतेखाली दि. ४ मे २0१३ रोजी झालेल्या बैठकीत ही समिती स्थापन करण्यात आली होती. राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये असलेल्या शिक्षकेतर पदांमध्ये समान नावे असणार्या पदनामाच्या नियुक्तीची कार्यपद्धती, अर्हता व सेवाप्रवेश पद्धती इत्यादी बाबी समान असाव्यात, यासाठी ही समिती तयार करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदावर असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव डॉ. धनराज माने यांची संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे-१ या पदावर नियुक्ती झाल्यामुळे समितीचे कामकाज पूर्ण होऊ शकले नाही. नव्याने तयार करण्यात आलेल्या समितीमध्ये अध्यक्षपदी सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव शिवशरण माळी यांची निवड करण्यात आली आहे. या समितीवर निवड झालेले महाराष्ट्रातील अन्य सदस्य पुढीलप्रमाणे डॉ. विनायक इरपाते (कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली), डॉ. व्ही. एन. शिंदे (उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), प्रदीप कोळी (उपकुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), दिनेश कांबळे (उपकुलसचिव, मुंबई विद्यापीठ), राकेश वळीव (प्र. उपकुलसचिव, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई), मलिक रोकडे (उपकुलसचिव, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर), वाय. डी. वाघमारे (उपकुलसचिव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव), व्ही. डी. चालीकवार (उपकुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड), एस. एस. भांबरे (उपकुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ), प्रवीण राठोड (उपकुलसचिव, संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती), दिलीप भरड (उपकुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद), प्रकाश जयस्वाल (उपकुलसचिव, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक नागपूर), रमेश शिंदे (अध्यक्ष, महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ), प्रकाश बच्छाव (प्रशासन अधिकारी उच्च शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे-१). (प्रतिनिधी) (फोटो टी/युजर/फोटो मध्ये एस.के.माळी व मलिक रोकडे नावाने सेव आहे.)