राज्य/ महत्वाचे/ कोल्हापूर
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:22+5:302015-09-01T21:38:22+5:30
जिरग्याळमध्ये म्हांडूळ पकडले; एकास अटक

राज्य/ महत्वाचे/ कोल्हापूर
ज रग्याळमध्ये म्हांडूळ पकडले; एकास अटकजत : होमहवन करून गुप्तधन काढण्याच्या उद्देशाने म्हांडूळ जवळ बाळगल्याच्या आरोपावरून हरिबा गंगाराम संकपाळ (४५, रा. जिरग्याळ, ता. जत) याच्याविरोधात जत पोलिसांत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. ही कारवाई सोमवारी दुपारी जिरग्याळ येथे करण्यात आली.दोन एसटी कर्मचारी निलंबितसातारा : येथे धावत्या एसटीची मागची चाकं व जोड अचानक निसटून गाडीपासून वेगळा झाला. त्यामुळं एसटी पुढं गेली व चाकं मागे राहिली. याप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत दोघांना निलंबित केले आहे. कोरेगाव आगारातील मुख्य कारागीर टी. बी. शेळके व सहायक कारागीर पवार यांचा निलंबितांत समावेश आहे.केएमटी कर्मचार्यांचा अधिकार्यांना घेरावकोल्हापूर : दोन महिन्यांच्या थकीत पगारासाठी सोमवारी, दुपारी केएमटीतील कर्मचार्यांनी परिवहन सभापती व अधिकार्यांना घेराव घालून जाब विचारला. सुमारे तासाभराच्या चर्चेनंतर जुलै महिन्याचा पगार १० सप्टेंबरपर्यंत देण्याचे अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांनी मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.ट्रक-कार अपघातात ६ जखमी चिपळूण : चिपळूण-कर्हाड रस्त्यावर खेर्डी येथे कोकण रेल्वे पुलाखाली सोमवारी पहाटे उभ्या असणार्या ट्रकवर विरुद्ध बाजूला जाऊन व्हॅगन आर कारने धडक दिल्याने कारमधील ६ जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.चिपळुणात पाण्याचे २८ नमुने दूषितअडरे : तालुक्यातील कामथे प्रयोगशाळेत तपासलेल्या ४०५ पाणी नमुन्यांपैकी २८ नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये २० विहिरींचे पाणी दूषित असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.