शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

सीबीआय तपासासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यकच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 05:10 IST

सर्वोच्च न्यायालय; बिगरभाजपशासित राज्यांसाठी महत्त्वाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोणत्याही प्रकरणाच्या सीबीआय तपासासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे, तसेच केंद्र सरकारला राज्य सरकारच्या संमतीशिवाय सीबीआयचे अधिकारक्षेत्र वाढविता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. महाराष्ट्रासहित जिथे बिगरभाजप सरकार आहे, अशा राज्यांसाठी हा निकाल अतिशय महत्त्वाचा आहे.

महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ, छत्तीसगड, पंजाब, मिझोराम या राज्यांनी कोणत्याही प्रकरणाच्या सीबीआय तपासासाठी राज्याची परवानगी असणे बंधनकारक केले आहे. सीबीआयला तपासासाठी असलेली सरसकट अनुमती या बिगरभाजपशासित राज्यांनी रद्द केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अजय खानविलकर, न्या. भूषण गवई यांच्या खंडपीठाने निकालात म्हटले आहे की, सीबीआयच्या अधिकार क्षेत्रासाठी राज्य सरकारची परवानगी घेणे केंद्र सरकारला बंधनकारक आहे. तशी तरतूद दिल्ली विशेष पोलीस अधिनियमात आहे. 

असे आहे मूळ प्रकरणउत्तरप्रदेशमधील फेर्टिको मार्केटिंग व इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. या कंपनीशी संबंधित एका घोटाळा प्रकरणात काही जणांविरोधात ऑगस्ट २०१९ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल दिला. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर नुकताच निर्णय देण्यात आला. कोल इंडियाकडून इंधन पुरवठा कराराखाली  घेतलेला कोळसा या कंपनीने काळ्या बाजारात विकल्याचा आरोप होता. त्यामुळे सीबीआयने या कंपनीच्या कार्यालयावर छापे घातले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग