करंबळी तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ
By Admin | Updated: May 10, 2014 19:41 IST2014-05-10T19:41:41+5:302014-05-10T19:41:41+5:30
करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील मंगाई तलावातील गाळ काढण्याच्या प्रारंभप्रसंगी तहसीलदार हनुमंत पाटील, गोरखनाथ डोईफोडे, सरपंच सरिता पन्हाळकर, उपसरपंच तानाजी चौगुले, तलाठी सुनीता काटे, ग्रामसेवक श्रीकांत सोनार, जयसिंग येसादे व ग्रामस्थ.

करंबळी तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ
क ंबळी (ता. गडहिंग्लज) येथील मंगाई तलावातील गाळ काढण्याच्या प्रारंभप्रसंगी तहसीलदार हनुमंत पाटील, गोरखनाथ डोईफोडे, सरपंच सरिता पन्हाळकर, उपसरपंच तानाजी चौगुले, तलाठी सुनीता काटे, ग्रामसेवक श्रीकांत सोनार, जयसिंग येसादे व ग्रामस्थ. क्रमांक : १००५२०१४-गड-०१गडहिंग्लज :करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील मंगाई तलावातील गाळ काढण्याच्या मोहिमेस तहसीलदार हनुमंत पाटील यांच्याहस्ते प्रारंभ झाला.म. फुले जलभूमी अभियानांतर्गत ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या तलावामुळे करंबळी गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. त्याचप्रमाणे करंबळीसह कौलगे व अत्याळ या तीन गावची शेती ओलिताखाली आली. मात्र, काही वर्षांपासून तलावात साचलेल्या गाळामुळे पाणीसाठा कमी होऊ लागला. त्यामुळेच लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.प्रांताधिकारी विवेक आगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांच्या प्रयत्नामुळे या कामाची सुरुवात झाली. या तलावासह गावातील बंधारे व विहिरी गाळमुक्त करण्याचा निर्धार गावकर्यांनी घेतला आहे.यावेळी तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ डोईफोडे, मंडल अधिकारी जोशीलकर, तलाठी सुनीता काटे, ग्रामसेवक श्रीकांत सोनार, तंटामुक्त अध्यक्ष जयसिंग येसादे, अनुप पाटील, ग्रा. पं. सदस्य रेखा शेरेकर, सीमा कांबळे, गीता माळी, मालूताई इंगळे, नारायण माळी, अरुण भोईटे, बळवंत मोटे, हरिबा जाधव, आप्पा सावंत, बबन मोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.सरपंच सरिता पन्हाळकर यांनी स्वागत केले. उपसरपंच तानाजी चौगुले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)