कवठेसारमध्ये पंचकल्याण पूजा महोत्सवास प्रारंभ
By Admin | Updated: May 12, 2014 17:45 IST2014-05-12T17:45:16+5:302014-05-12T17:45:16+5:30

कवठेसारमध्ये पंचकल्याण पूजा महोत्सवास प्रारंभ
>दानोळी : कवठेसार (ता. शिरोळ) येथील श्री १००८ महावीर भगवान समवसरण पूजा महामहोत्सवास आज (सोमवार) पासून धार्मिक वातावरणात सुरूवात झाली. सकाळी सौधर्म इंद्र-इंद्रायणी सौ. सुजाता व अभयकुमार तेरदाळे यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीमध्ये अष्टकुमारीका, ५६ कुमारिका सहाभागी झाले होते.सौ. कमल व रावसाहेब किणीकर आणि सुकुमार भूपाल मगदूम यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले. त्यानंतर हत्तीवरून सवाद्य मिरवणूकीद्वारे संतोष देसाई यांनी मगलकुंभ आणले. इंद्र-इंद्रायणी सुजाता व अभयकुमार तेरदाळे, धनपती कुबेर निता व संजय मगदूम, सुवर्ण सौभाग्यवती माणिक व दर्शन गाडवे यांच्या उपस्थितीत मंगल कुंभनयन, पंचामृत अभिषेक, शातीमंत्र, यागमंडल, आराधणा, लघुशांतीक, शांतीहोम, पंचकुंभविन्यास, वास्तशांती मृतिका संग्रह, अंकुर रोपण या धार्मिक विधी पार पडल्या. दुपारी भद्रकुंभानयन तीर्थंकर माता-पिता सौ. भारती व अशोक मगदूम यांच्या उपस्थितीत कुबेराद्वारा रत्नवृष्टी, सोळा स्वप्न दर्शन, फल कथन, गर्भकल्याणिक महोत्सव व संस्कार झाले.त्यानंतर पंचकल्याण महोत्सव मंगलमय वातावरणात मुनीवरांचे त्यांगीचे मंगल प्रवचन झाले.(वार्ताहर)फोटो - १२०५२०१४-जेएवाय-०१फोटो ओळी - कवठेसार (ता. शिरोळ) येथे पंचकल्याण पूजा महोत्सवात मंगलकुंभाची मिरवणूक काढण्यात आली.