जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ
By Admin | Updated: June 30, 2014 00:46 IST2014-06-30T00:46:02+5:302014-06-30T00:46:02+5:30
ओडिशातील पुरी आणि गुजरातेतील जमालपूर येथे काढण्यात आली. यावेळी दोन्ही ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ
>अहमदाबाद / पुरी : भगवान जगन्नाथ यांची जगप्रसिद्ध वार्षिक रथयात्र आज ओडिशातील पुरी आणि गुजरातेतील जमालपूर येथे काढण्यात आली. यावेळी दोन्ही ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या प्रसंगाचा साक्षीदार बनण्यासाठी देशभरातील हजारो भाविकांनी ओडिशाची धार्मिकनगरी पुरी येथे गर्दी केली होती. रथयात्रेत सहभागी भाविक 12 व्या शतकातील श्री जगन्नाथ मंदिरातील आपल्या देवी-देवतांचे दर्शन घेण्यासाठी आतूर झाले होते.
हवाई आणि समुद्र किना:यावर 6, 52क् सुरक्षा जवानांचा पहारा होता. गुजरातेतील जमालपूर परिसरातील प्राचीन जगन्नाथ मंदिरात आज सकाळी भगवान जगन्नाथ यांच्या 137 व्या रथयात्रेला प्रारंभ झाला.
शेकडो वर्ष जुन्या प्रथेनुसार प्रारंभी हत्तींनी भगवान जगन्नाथ यांचे दर्शन घेतले आणि त्यानंतर रथयात्रेला प्रारंभ झाला. शहरातील विविध भागातून यात्र काढण्यात आली. रथयात्रेला 4क्क् वर्षाहून अधिक जुन्या मंदिरातून सुरुवात झाली. ही यात्र शहरातील जवळपास 14 किमी मार्गाने काढली जाणार आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी रथयात्रेसाठी ‘सोन्याच्या केरसुणी’ने ‘पाहिन्द विधी’ केला. यावेळी त्यांनी भगवान जगन्नाथ यांच्या रथासाठी मार्गाची प्रतिकात्मक स्वच्छता केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. (वृत्तसंस्था)