हरिनाम सप्ताहास मौजे सुकेणेमध्ये प्रारंभ

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:11+5:302015-02-14T23:52:11+5:30

कसबे सुकेणे : भजनी मंडळ मौजे सुकेणे (ता. निफाड) यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक संघ मंडळ, मौजे सुकेणे यांच्या हस्ते अखंड हरिनाम सप्ताहास मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आल्याची माहिती पत्रकान्वये दिली.

Start of Harman Weeks in Funy Sukane | हरिनाम सप्ताहास मौजे सुकेणेमध्ये प्रारंभ

हरिनाम सप्ताहास मौजे सुकेणेमध्ये प्रारंभ

बे सुकेणे : भजनी मंडळ मौजे सुकेणे (ता. निफाड) यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक संघ मंडळ, मौजे सुकेणे यांच्या हस्ते अखंड हरिनाम सप्ताहास मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आल्याची माहिती पत्रकान्वये दिली.
सप्ताहास रोज पहाटे काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण श्री हरि प्रवचन, हरिपाठ, स्वाध्याय व रात्री ९ ते ११ श्रीहरी कीर्तन असे कार्यक्रम आहे. शनिवारी (दि. १४) न्यायाधीश मदन महाराज गोसावी मुंबई यांचे कीर्तन रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत, रविवारी (दि. १५) पद्माकर महाराज देशमुख अमरावतीकर, सोमवारी (दि. १६) रात्री ९ ते ११ भागवताचार्य माधवदास राठी यांचे कीर्तन तर मंगळवारी (दि.१७) रामायणचार्य रामनाथ महाराज (वैजापूर) शिंदे यांचे कीर्तन होईल. बुधवारी (दि. १८) भरत महाराज मिटके, राणेनगर, सिडको यांचे सकाळी ९ ते ११ काल्याचे कीर्तन व महाप्रसाद होणार आहे.
दरम्यान, दररोज श्री बाणेश्वर महादेव मंदिर मौजे सुकेणे येथे सायंकाळी ५ ते ६ वा. प्रवचन सर्वश्री नरहरी खोडे, अशोक महाराज खापरे, संतोष वाघ, पुंडलिक चव्हाण यांचे होणार आहे.
भाविक उपासकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अशोक महाराज खापरे, भिकाजी महाराज उगले यांनी केले आहे.
(वार्ताहर)

Web Title: Start of Harman Weeks in Funy Sukane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.