राष्ट्रवादी-मनसेचे साटेलोटे उघडशिवसेनेने रिपाइंच्या ललिता भालेराव यांना उमेदवारी देत स्थायीच्या इतिहासात प्रथमच एका मागासवर्गीय महिलेला संधी दिली आहे आणि त्याच अधिकृत उमेदवार आहेत. स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपानेही उमेदवार दिला असला तरी सेना-भाजपा व रिपाइं एकत्र येऊन निवडणूक लढवेल. सभापतिपदासाठी मनसेने अर्जच दाखल न केल्याने राष्ट्रवादी व मनसे यांच्यातील साटेलोटे उघड झाले आहे. एकमेकांवर विखारी टीका करणार्या आणि मफलर आवळण्याची भाषा करणार्या मनसेने स्वत:च्याच गळ्यात मफलर घालून घेतली आहे. सत्तेसाठी वाेल ते करणार्या मनसेचा भोंदूपणा उघड झाला आहे. - अजय बोरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेनाइन्फोनिवडणुकीत पत्ते खोलूकॉँग्रेसने अद्याप राष्ट्रवादीला पाठिंब्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यांच्यासमवेत चर्चा सुरू आहे, परंतु कॉँग्रेसने अधिकृतपणे राहुल दिवे यांना उमेदवारी दिली असून, वरिष्ठांकडून जो अंतिम आदेश येईल त्याचे पालन केले जाईल. कॉँग्रेसचेही स्वतंत्र अस्तित्व आहे. - उत्तमराव कांबळे, गटनेता, कॉँग्रेसइन्फोपक्षनिष्ठेमुळे विश्वासपक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने मला स्थायी समिती सभापतिपदासाठी उमेदवारी मिळाली आहे. माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविला जाईल. मनसेच्या पाठिंब्याबाबत वरिष्ठांकडूनच निर्णय होईल.- शिवाजी चुंभळे, उमेदवार, राष्ट्रवादी फोटो कॅप्शन- २० पीएचएमआर ९७स्थायी समिती सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे शिवाजी चुंभळे. समवेत छबू नागरे, रवींद्र पगार, शोभा आवारे, अर्जुन टिळे, प्रा. कविता कर्डक, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर व गटनेता उत्तमराव कांबळे आदि.फोटो कॅप्शन- २० पीएचएमआर ९८राहुल दिवेफोटो कॅप्शन- २० पीएचएमआर ९९प्रा. कुणाल वाघफोटो कॅप्शन- २० पीएचएमआर १००ललिता भालेराव
स्थायी समिती जोड
By admin | Updated: March 21, 2015 00:13 IST