शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीची परिस्थिती, 3 भाविक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 14:57 IST

Tirumala Venkateswara Temple: मिळालेल्या माहितीनुसार, सर्वदर्शनम  तिकीट (Sarvadarsanam ticket) काढण्यासाठी भाविक आले होते, त्यामुळे तिकीट काउंटरवर मोठी गर्दी झाली होती.

हैदराबाद : आंध्र प्रदेशातील तिरुमाला व्यंकटेश्वरा (तिरुपती बालाजी) मंदिरात आज भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे आतापर्यंत तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वदर्शनम  तिकीट (Sarvadarsanam ticket) काढण्यासाठी भाविक आले होते, त्यामुळे तिकीट काउंटरवर मोठी गर्दी झाली होती.

आज तिरुपतीमधील तिन्ही तिकीट काउंटरवर प्रचंड गर्दी होती. चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आम्ही भाविकांना विना तिकीट दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला. सध्या परिस्थिती सामान्य असून भाविक आरामात देवाचे दर्शन घेत आहेत, असे तिरुमला तिरुपती देवस्थानमचे (TTD) पीआरओ रवी कुमार यांनी सांगितले. 

वेळेत होतो बदलतिरुमाला व्यंकटेश्वर मंदिरातील सर्वदर्शनम तिकीट सुविधेद्वारे सर्वांना मोफत दर्शन मिळते. मात्र, यामध्ये नंबर येण्यास बराच वेळ लागतो. मोफत सुविधेमुळे येथे अनेकदा मोठी रांग लागते. आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी सर्वदर्शनमच्या वेळेत बदल होतो. इतर मंदिरांतील दर्शनाच्या पद्धतींपेक्षा यामध्ये नंबर येण्यास जास्त वेळ लागतो.

 दरवर्षी लाखो भाविक येतातकोरोनामुळे तिरुमाला व्यंकटेश्वर मंदिर गेल्या दोन वर्षांपासून भाविकांसाठी बंद होते. यावर्षी 14 मार्च रोजी तिरुमाला व्यंकटेश्वर मंदिरात भाविकांना प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तिरुमाला वेंकटेश्वर मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे येतात. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटTempleमंदिर