एस.टी.बसच्या धडकेत महिला मजूर ठार
By Admin | Updated: December 20, 2014 22:26 IST2014-12-20T22:26:58+5:302014-12-20T22:26:58+5:30
कुरुंदवाड : उसाने भरलेल्या बैलगाडीला एस.टी.बस धडकल्याने बैलगाडी उलटून झालेल्या अपघातात ऊसतोड महिला मजूर ठार झाली. कोमल आबासाहेब पाळवदे (वय २०, रा. पाचोरे, ता. केज, जि. बीड) असे त्या महिलेचे नाव आहे. राजापूर-अकिवाट रस्त्यावर अकिवाट गावाजवळ सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

एस.टी.बसच्या धडकेत महिला मजूर ठार
क रुंदवाड : उसाने भरलेल्या बैलगाडीला एस.टी.बस धडकल्याने बैलगाडी उलटून झालेल्या अपघातात ऊसतोड महिला मजूर ठार झाली. कोमल आबासाहेब पाळवदे (वय २०, रा. पाचोरे, ता. केज, जि. बीड) असे त्या महिलेचे नाव आहे. राजापूर-अकिवाट रस्त्यावर अकिवाट गावाजवळ सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.याबाबत अधिक माहिती अशी की, सायंकाळी राजापूर (ता. शिरोळ) येथून बैलगाडीमध्ये ऊस भरून बैलगाडी कारखान्याकडे जात होत्या. अकिवाट गावाजवळ येताच समोरून कुरुंदवाड आगाराची एस.टी.बस राजापूरच्या दिशेने जात होती. रस्ता उंच भरावाचा व अरुंद असल्याने एस.टी.बस बाजूने जात असताना बैलगाडीच्या जुला धडकल्याने बैलगाडी उंच भरावाच्या रस्त्यावरून उलटली. उसाने भरलेल्या बैलगाडीवर बसलेली महिला मजूर कोमल उसाखाली सापडल्याने ती जागीच ठार झाली, तर एक जखमी असून, त्यांचे नाव समजू शकले नाही. कुरुंदवाड पोलिसांत या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.