शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आपण 30 वर्षांचे झालात, आणखी किती वर्षांपर्यंत जगू शकता? जाणून घ्या, भारतीयांचं वय वाढतय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 15:55 IST

SRS report : SRS च्या Abridged Life Table 2015-19 चा अहवाल नुकताच जारी झाला आहे. यात, भारतीयांचे सरासरी वय 69.7 वर्षं एवढे झाले असल्याचे समोर आले आहे.

भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचे सरासरी वय केवळ 32 वर्षे होते. अर्थात तेव्हा भारतीय लोक सरासरी केवळ 32 वर्षांपर्यंतच जगू शकत होते. मात्र, आता हे सरासरी वय 69 वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. म्हणजेच स्वातंत्र्यानंतर भारतीयांच्या सरासरी वयात दुप्पट पेक्षाही अधिक वाढ झाली आहे. सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टमच्या (SRS) नव्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. मात्र, असे असले तरी जागतिक सरासरीचा विचार करता हे अद्यापही कमीच आहे. जगातील सरासरी वय 72 वर्षे 6 महिने एवढे आहे.

SRS च्या Abridged Life Table 2015-19 चा अहवाल नुकताच जारी झाला आहे. यात, भारतीयांचे सरासरी वय 69.7 वर्षं एवढे झाले असल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर, पुरुषांच्या तुलनेत महिला अडीच वर्षे अधिक जगतात. देशातील पुरुषांचे सरासरी वय 68 वर्षे 4 महिने आहे, तर महिलांचे सरासरी वय 71 वर्षे 1 महिना एवढे आहे, असेही या अहवालातून समोर आले आहे. 

याच बरोबर, शहरी लोकांचे वय ग्रामीण लोकांच्या तुलनेत अधिक आहे. शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे सरासरी वय 73 वर्षे आहे, तर खेड्यात राहणाऱ्यांचे वय 68 वर्षे 3 महिने आहे, असेही या अहवालात म्हणण्यात आले आहे.

दिल्लीतील लोकांचे सरासरी वय सर्वात जास्त, छत्तीसगडमधील लोकांचे सर्वात कमी - या अहवालानुसार दिल्लीतील लोकांचे सरासरी वय सर्वात जास्त आहे. येथील लोकांचे सरासरी वय 75 वर्षे 9 महिने आहे. तर सर्वात कमी सरासरी वय छत्तीसगडमधील लोकांचे आहे, येथील लोक 65 वर्षे आणि 3 महिने जगू शकतात. दिल्लीपाठोपाठ केरळचा क्रमांक लागतो, येथील लोकांचे सरासरी वय 75 वर्षे 2 महिने एवढे आहे. तर महाराष्ट्रातील लोकांचे सरासरी वय 72.7 वर्ष एवढे सांगण्यात आले आहे. यातही पुरुषांचे सरासरी वय 71.6 तर महिलांचे सरासरी वय 74.0 एवढे सांगण्यात आले आहे. 

वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांनंतर आपण किती वर्षांपर्यंत जगू शकता - ?या अहवालात भारतामध्ये एक ठरावीक वय पार केल्यानंतर, आणखी किती वर्षांपर्यंत जगता येऊ शकते, याचाही अंदाज लावण्यात आला आहे. उदाहरणार्थ, जन्माच्या वेळी तुमचे सरासरी वय 69 वर्षे 7 महिने आहे. मात्र, जर वयाचे 1 वर्ष पूर्ण झाले तर आणखी 71.3 वर्षे जगू शकतात. वयाचे 5 वर्षे पूर्ण झाली तर आणखी 67.7 वर्षे अधिक जगू शकता.

याच प्रमाणे, वयाची 10 वर्षे पार केल्यानंतर आणखी 62.9 वर्षे जगू शकतात. 20 वर्षांच्या वयानंतर आणखी 53.3 वर्षांपर्यंत जगू शकता. वयचे 30 वर्ष ओलांडल्यानंतर, आणखी 43.9 वर्षे जगू शकता. 40 वर्ष ओलांडल्यानंतर आणि 34.7 वर्षे जगता येईल, वयाची 50 वर्ष ओलांडल्यानंतर आणि 26 वर्षे गता येईल, वयाची साठी ओलांडल्यानंतर, आणखी 18.3 वर्षे आणि 70 वर्षे पूर्ण केल्यानंतर आणखी नंतर 11.8 वर्षे जगता येऊ शकते.

टॅग्स :IndiaभारतWomenमहिलाHealthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्रdelhiदिल्लीChhattisgarhछत्तीसगडKeralaकेरळ