भुयारी गटारीचे पाणी शेतीसाठी वापरणार श्रीरामपूर पालिका: १८ हजार घरांना जोडणी
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:53+5:302015-02-14T23:51:53+5:30
श्रीरामपूर : केंद्र सरकारच्या लहान व मध्यम शहरांसाठी लागू असलेल्या यूआयडीएसएसएमटी योजनेतून श्रीरामपूरमध्ये सुरू असलेल्या भुयारी गटारीच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुढे शेतीसाठी वापरणार असल्याचे नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांनी सांगितले.

भुयारी गटारीचे पाणी शेतीसाठी वापरणार श्रीरामपूर पालिका: १८ हजार घरांना जोडणी
श रीरामपूर : केंद्र सरकारच्या लहान व मध्यम शहरांसाठी लागू असलेल्या यूआयडीएसएसएमटी योजनेतून श्रीरामपूरमध्ये सुरू असलेल्या भुयारी गटारीच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुढे शेतीसाठी वापरणार असल्याचे नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांनी सांगितले.या गटारीच्या एकूण १३९ किलोमीटर कामापैकी ३३ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. श्रीरामपूर शहर सध्या झपाट्याने वाढत आहे. या शहराची आगामी २५ वर्षांची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन त्या दृष्टिकोनातून या भुयारी गटार योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे उघड्या गटारीमुळे नागरिकांना होणार्या डासांचा उपद्रव कमी होऊन रोगराईला प्रतिबंध होणार आहे. गोंधवणीरोड, कॉलेजरोड, बेलापूररोड, बाजाररोड, संजयनगर, बोरावकेनगररोड, महावीर मार्केटरोड, कुंभार गल्ली परिसर आदी प्रमुख रस्ते व त्याला जोडणारे अंतर्गत रस्ते येथे भुयारी गटारीच्या मुख्य वाहिनीचे काम प्रगतीपथावर आहे. या कामामुळे शहरातील १८ हजार घरांचे सांडपाणी या भूमिगत गटारीस जोडले आहे. दोन सांडपाणी प्रकल्प केंद्र व पंप हाऊस उत्तर व दक्षिण भागात स्वतंत्रपणे कार्यान्वित होणार आहे. मुख्य जलवाहिनीस रस्त्याच्या दोन्ही बाजूचे प्रत्येकी ४ ते ५ घरांसाठी १ सर्व्हिस चेंबरचे बांधकाम करून त्याठिकाणी त्या घरांचे सांडपाणी जोडले जाणार आहे. सांडपाणी मुख्य जलवाहिनीद्वारे पंप हाऊस व सांडपाणी प्रक्रिया केंद्रात जाणार असून त्याठिकाणी या पाण्यावर प्रक्रिया होऊन ते पाणी पुढे शेतीसाठी वापरले जाणार आहे. सन २०१३ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या या योजनेसाठी ४९.३६ कोटी रुपये अंदाजपत्रकीय रक्कम मंजूर आहेत. (प्रतिनिधी)