नामपूरच्या श्रीराम पतसंस्थेला या वर्षात १० लाखाचा नफा

By Admin | Updated: August 28, 2015 23:37 IST2015-08-28T23:37:09+5:302015-08-28T23:37:09+5:30

नामपूर : येथील श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेस चालू आर्थिक वर्षात १० लाख १ हजार ३३३ रुपये निव्वळ नफा झाला आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष जगदीश सावंत, उपाध्यक्ष विजय अहिरे यांनी दिली. संस्थेच्या आर्थिक प्रगतीबाबत माहिती देताना अध्यक्ष सावंत म्हणाले की, संस्थेचे ४८ लाख ५९ हजार रुपये भागभांडवल, तर ६९ लाख ३५ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. पतसंस्थेने १ कोटी १९ लाख रुपयांचे कर्जवाटप केले असून, १८ लाख ८७ हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. सभासदांना चालू वर्षात १३ टक्क्याने लाभांषाचे वाटप करण्यात येणार आहे. संस्थेच्या आर्थिक यशात संचालक रवींद्र कापडणीस, अरुण धोंडगे, भिका धोंडगे, रवींद्र धोंडगे, प्रवीण सावंत, शालिग्राम बागुल, योगेश मोराणे, रत्नाबाई नेर, सुरेखा खैरनार, सचिव रवींद्र सोनवणे, कर्मचारी वृंद आदिंचा वाटा असल्याचे सावंत, अहिरे यांनी स

Sriram Credit Society of Nampur gets 10 lakh profits this year | नामपूरच्या श्रीराम पतसंस्थेला या वर्षात १० लाखाचा नफा

नामपूरच्या श्रीराम पतसंस्थेला या वर्षात १० लाखाचा नफा

मपूर : येथील श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेस चालू आर्थिक वर्षात १० लाख १ हजार ३३३ रुपये निव्वळ नफा झाला आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष जगदीश सावंत, उपाध्यक्ष विजय अहिरे यांनी दिली. संस्थेच्या आर्थिक प्रगतीबाबत माहिती देताना अध्यक्ष सावंत म्हणाले की, संस्थेचे ४८ लाख ५९ हजार रुपये भागभांडवल, तर ६९ लाख ३५ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. पतसंस्थेने १ कोटी १९ लाख रुपयांचे कर्जवाटप केले असून, १८ लाख ८७ हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. सभासदांना चालू वर्षात १३ टक्क्याने लाभांषाचे वाटप करण्यात येणार आहे. संस्थेच्या आर्थिक यशात संचालक रवींद्र कापडणीस, अरुण धोंडगे, भिका धोंडगे, रवींद्र धोंडगे, प्रवीण सावंत, शालिग्राम बागुल, योगेश मोराणे, रत्नाबाई नेर, सुरेखा खैरनार, सचिव रवींद्र सोनवणे, कर्मचारी वृंद आदिंचा वाटा असल्याचे सावंत, अहिरे यांनी सांगितले.(वा.प्र.)

Web Title: Sriram Credit Society of Nampur gets 10 lakh profits this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.