श्रीनिवासन यांची हकालपट्टी करा
By Admin | Updated: June 2, 2014 23:44 IST2014-06-02T23:44:25+5:302014-06-02T23:44:25+5:30
क्रिकेटची सर्वोच्च संस्था असलेल्या आयसीसीच्या माध्यमातून श्रीनिवासनप्रकरणी हस्तक्षेप करावा, असे पत्रत नमूद केले. त्यांनी दुसरे पत्र बीसीसीआयशी संलगA असलेल्या सर्व राज्य संघटनांना लिहिले.

श्रीनिवासन यांची हकालपट्टी करा
>कोलकाता : आंतरराष्ट्रीय आणि आशियाई क्रिकेट परिषदेतून बीसीसीआय प्रमुख एन. श्रीनिवासन यांची हकालपट्टी करण्यासाठी आपापल्या क्रिकेट बोर्डावर दबाव आणावा, यासाठी क्रिकेट असोसिएशन ऑफ बिहारचे सचिव आदित्य वर्मा यांनी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांच्या पंतप्रधानाना आवाहन करणारे पत्र लिहिले आहे.
क्रिकेटची सर्वोच्च संस्था असलेल्या आयसीसीच्या माध्यमातून श्रीनिवासनप्रकरणी हस्तक्षेप करावा, असे पत्रत नमूद केले. त्यांनी दुसरे पत्र बीसीसीआयशी संलगA असलेल्या सर्व राज्य संघटनांना लिहिले. त्यात दोषी श्रीनिवासन यांना पाठिंबा देऊ नये, असे आवाहन केले आहे. माङया पत्रचे उत्तर एका आठवडय़ात द्यावे , जेणोकरून सर्वोच्च न्यायालयात ही लढाई लढण्यासाठी आपल्या सहकार्याचे बळ मिळू शकेल, असे पुढे म्हटले आहे.
वर्मा म्हणतात, की श्रीनिवासन यांनी आयसीसी आणि एसीसीमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधित्व केल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केली. श्रीनिवासन हे स्वत:ला सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे मानतात, असे वाटू लागले आहे. न्यायालयाचा आदेश झुगारणारी व्यक्ती अशी असू शकते, हे यावरून सिद्ध होते.
तिन्ही देशांच्या प्रमुखांना पत्र लिहिण्यासंदर्भात वर्मा म्हणाले, की भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे क्रिकेटची महाशक्ती आहेत. या देशांच्या पंतप्रधानांनी आपापल्या बोर्डावर दबाव आणल्यास श्रीनिवासन यांची उचलबांगडी होऊ शकते. भारतीय क्रिकेटमध्ये श्रीनिवासन यांच्यापुढे बोलण्याची हिंमत कुणामध्ये नाही. मान्यताप्राप्त संघटनांनीदेखील याबाबत मौन पाळण्याचे सावध धोरण स्वीकारले. मला न्यायसंस्थेवर विश्वास असल्याने आम्ही श्रींची दादागिरी सहन करू शकत नाही.