शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
2
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
3
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
4
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
5
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
6
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
8
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
9
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
10
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
11
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
12
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
13
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
14
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
15
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
16
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
17
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
18
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
19
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
20
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज

पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 20:29 IST

Pakistan Spy News: युट्यूबर ज्योती मल्होत्रामुळे उघडकीस आलेले पाकिस्तानच्या हेरांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. राज्य विशेष मोहीम विभागाने याच प्रकरणात आणखी एका युट्यूबरला अटक केली आहे.

Jasbir Singh pakistan spy news: पंजाब पोलिसांच्या विशेष पोलीस पथकाने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात एका युट्यूबरला अटक केली आहे. जसबीर सिंग असे या युट्यूबरचे नाव असून, तो पाकिस्तान प्रणित हेरगिरी नेटवर्कमध्ये सहभागी असल्याचे तपासातून समोर आले आहे. तो जानमहल नावाचे युट्यूब चॅनेल चालवतो. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राज्य विशेष मोहीम विभागाच्या पथकाने मोहालीतून जसबीर सिंगला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी जसबीर सिंग हा थेट पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. 

जसबीरने कोणत्या अधिकाऱ्याला दिली माहिती?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील अधिकारी शाकीर ऊर्फ जट्ट रंधावा याच्या संपर्कात होता. तो आयएसआयचा पाठिंबा असलेल्या दहशतवाद्यांशी संबंधित हेरगिरी नेटवर्कमध्येही सहभागी आहे. जसबीर सिंग याने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्याला भारतीय सुरक्षा दलाबद्दल संवेदनशील माहिती दिली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

कोण आहे जसबीर सिंग?

४१ वर्षीय जसबीर सिंग हा युट्यूब चॅनेल चालवतो. तो पंजाबमधील रोपर जिल्ह्यात असलेल्या महलान गावाचा आहे. तो सध्या रुपानगरमध्ये राहतो. त्यांच्या युट्यूबवरील फोटोवर माझा शेतकऱ्यांना पाठिंबा असा हॅशटॅग आहे. 

वाचा >>धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत

जसबीर सिंग १.१ मिलियन सबस्क्रायबर असलेले जानमहल व्हिडीओ हे चॅनेल चालवतो. या चॅनेलवर तो मुख्यतः पर्यटनाबद्दलचे व्हिडीओ टाकतो. त्याने मलेशिया, मालदीव, थायलंड आणि इतर देशातील भटकंतीचे व्हिडीओ टाकलेले आहेत. 

जसबीर सिंगचे इन्स्टाग्रामवर ४२००० फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवरील बायोमध्ये त्याने फूड व्लॉगर असे लिहिलेले आहे. त्याने दोन दिवसांपूर्वी शेवटची पोस्ट अपलोड केलेली आहे. त्याचा मुलगा मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात पंजाबचा विजय झाल्याचा आनंद व्यक्त करतानाचा हा व्हिडीओ आहे. 

ज्योती मल्होत्रासोबत संपर्क

पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी जसबीर सिंगला अटक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जसबीर सिंग ज्योती मल्होत्रासोबतही संपर्कात होता, असेही त्यांनी सांगितले. ज्योती मल्होत्राला १५ मे २०२५ रोजी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात अटक झालेली आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानISIआयएसआयIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान