शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

Corona Vaccine: स्पुटनिक व्ही लसीच्या ३० कोटी डोसचे भारतात होणार उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 3:25 AM

रशियाने केला विविध औषध कंपन्यांशी करार

नवी दिल्ली : रशियाने विकसित केलेल्या स्पुटनिक व्ही या लसीच्या ३० कोटी डोसचे भारतामध्ये पुढच्या वर्षी उत्पादन होणार आहे. विविध भारतीय कंपन्यांशी रशियाने स्पुटनिक व्ही लसीच्या डोसच्या उत्पादनाबाबत करार केले असून, त्यामुळे या उत्पादनाचे प्रमाण पूर्वीपेक्षा तिप्पट झाले आहे. रशियाने विकसित केलेल्या व भारतात उत्पादन केलेल्या स्पुटनिक व्ही लसीची चाचणी दिल्लीतील रशियन दूतावासामध्ये सुरू आहे. ही माहिती रशियाच्या अधिकाऱ्यांनीच ट्विटरवर दिली. भारत हा जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. लस उत्पादनाची क्षमता वाढविण्यासाठी भारतीय औषध कंपन्यांनी मोठी तयारी केली आहे. जगभरात कोरोना लसींना आगामी काळात प्रचंड मागणी येणार असून, त्यांच्या उत्पादनाचे जास्तीतजास्त काम भारतीय कंपन्यांना मिळावे, असा केंद्र सरकारचाही प्रयत्न आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थेच्या सूत्रांनी सांगितले की, हिटेरो बायोफार्मा ही कंपनी स्पुटनिक व्ही या लसीचे १० कोटी डोस बनविणार असून, त्याबाबतचा करार या आधीच झाला आहे.लस ९१ टक्के परिणामकारक? स्पुटनिक व्ही लस ९१ टक्के परिणामकारक आहे, असा दावा रशियाने केला आहे. या लसीच्या भारतातील मानवी चाचण्या डॉ.रेड्डीज लॅबोरेटरीज या कंपनीतर्फे पार पाडल्या जात आहेत. या लसीचे वितरणही हीच कंपनी करणार आहे.सर्व कोरोना रुग्णालयातील अग्निप्रतिबंधक साधनांची तपासणी करा -सुप्रीम कोर्टदेशातील कोरोना रुग्णालयांमध्ये गेल्या काही महिन्यात आगी लागून रुग्ण व कर्मचारी मरण पावल्याच्या घटना घडल्या होत्या. भविष्यात असे प्रसंग येऊ नयेत, म्हणून देशातील सर्व कोरोना रुग्णालयांमध्ये पुरेशी अग्निप्रतिबंधक साधने आहेत की नाही याची तपासणी करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, देशातील सर्व कोरोना रुग्णालयांनी अग्निशमन विभागाकडून चार आठवड्यांच्या आत ना हरकत प्रमाणपत्र मिळवावे. हा आदेश न पाळणाऱ्या कोरोना रुग्णालयांवर कडक कारवाई केली जाईल.सर्वोच्च न्यायालयाचे न्या.अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील व न्या. आर. एस. रेड्डी व न्या. एम. आर. शहा यांचा समावेश असलेल्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. गंभीर दखल... गुजरातच्या राजकोट येथील कोरोना रुग्णालयाला २७ नोव्हेंबर रोजी पहाटे लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू, तर एक रुग्ण गंभीररीत्या भाजला होता. त्या आधी ऑगस्ट महिन्यात अहमदाबादमध्ये कोरोना रुग्णालयाला आग लागून आठ जण मरण पावले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या