क्रीडा : स्काय युनायटेड आश्वेचा सहज विजय
By Admin | Updated: August 2, 2015 23:31 IST2015-08-02T23:31:44+5:302015-08-02T23:31:44+5:30
पेडणे : मधलावाडा-मोरजी येथील यंग स्टार युनायटेड आयोजित भारतीय जनता पार्टी फुटबॉल स्पर्धेच्या शुभारंभी सामन्यात स्काय युनायटेड आश्वेने एफ. सी. आगरवाडा संघाचा 4-1 असा पराभव करीत पुढील फेरीत सहज प्रवेश केला.

क्रीडा : स्काय युनायटेड आश्वेचा सहज विजय
प डणे : मधलावाडा-मोरजी येथील यंग स्टार युनायटेड आयोजित भारतीय जनता पार्टी फुटबॉल स्पर्धेच्या शुभारंभी सामन्यात स्काय युनायटेड आश्वेने एफ. सी. आगरवाडा संघाचा 4-1 असा पराभव करीत पुढील फेरीत सहज प्रवेश केला.पेडणे तालुका र्मयादित आयोजित केलेल्या फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन हरमल जिल्हा पंचायत सदस्य अरुण बानकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोरजीचे सरपंच वैशाली मच्छिंद्रनाथ शेटगावकर, माजी जिल्हा सदस्य दीपक कळंगुटकर, हरमलचे उपसरपंच प्रदीप नाईक, प्रकाश शेटगावकर, डॉमनिक कादरेज, सुनील म्हाळोजी उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक फोंडेकर यांनी केले. यावेळी अरुण बानकर यांनी खिलाडूवृत्तीने सर्व खाळेडूंनी खेळाचे दर्शन घडवत क्रीडा क्षेत्रात प्रगती साधण्याचे आवाहन केले.या स्पर्धेत विजेत्या संघाला 20 हजार व भारतीय जनता पार्टी चषक, तर उपविजेत्याला 15 हजार व चषक देण्यात येईल.स्पर्धेत जॉली इलवेन्डर, सेन्ट अँन्थनी हरमल, स्काय युनायटेड आश्वे, एफसी आगरवाडा, मानार बॉयज, कोरगाव बॉयज, सांव पेद्रो, ध्रुवपार्से, एम.एस.सी. व मिलाग्रीस मांद्रे या 10 संघांनी सहभाग दर्शवला आहे.या स्पर्धेतील अंतिम साना 13 सप्टेंबर रोजी होणार आहे.(प्रतिनिधी)फोटो ओळी-मोरजी येथे यंगस्टार आयोजित भारतीय जनता पार्ट फुटबॉल कप स्पर्धेत शुभारंभी सामन्याच्या संघासोबत जिल्हा सदस्य अरुण बानकर, दीपक कळंगुटकर, सरपंच वैशाली शेटगावकर, प्रकाश शेटगावकर, उपसरपंच प्रदीप नाईक. (छाया : निवृत्ती शिरोडकर)