हेरगिरी; लष्करातील हवालदाराला अटक

By Admin | Updated: December 6, 2015 22:57 IST2015-12-06T22:57:50+5:302015-12-06T22:57:50+5:30

आयएसआयशी संबंधित असलेल्या हेरगिरी रॅकेटच्या संदर्भात दिल्ली पोलिसांनी भारतीय लष्करात सेवारत असलेल्या एका हवालदाराला सिलिगुडी येथे रविवारी अटक केली.

Spies; Army constable arrested | हेरगिरी; लष्करातील हवालदाराला अटक

हेरगिरी; लष्करातील हवालदाराला अटक

नवी दिल्ली : आयएसआयशी संबंधित असलेल्या हेरगिरी रॅकेटच्या संदर्भात दिल्ली पोलिसांनी भारतीय लष्करात सेवारत असलेल्या एका हवालदाराला सिलिगुडी येथे रविवारी अटक केली. याबरोबरच हेरगिरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या पाच झाली आहे.
फरीद खान असे या हवालदाराचे नाव आहे. आयएसआयसाठी काम करणाऱ्या इसमाला गोपनीय माहिती पुरविल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ‘सिलिगुडी येथे गेलेल्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी खान याला अटक केली, असे संयुक्त पोलीस आयुक्त रवींद्र यादव यांनी सांगितले.

Web Title: Spies; Army constable arrested