शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
4
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
5
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
6
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
7
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
8
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
9
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
10
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
11
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
12
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
13
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
14
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
15
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
16
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
17
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
18
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
19
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
20
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन

Spicejet Plane: ‘स्पाइसजेट’च्या विमानात पुन्हा गडबड; चीनला जाणाऱ्या विमानाची कोलकात्यात इमरजंसी लँडिंग

By ओमकार संकपाळ | Updated: July 6, 2022 15:00 IST

Spicejet Plane: स्पाइसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची गेल्या 18 दिवसांतील ही आठवी घटना आहे. काल एका विमानाची पाकिस्तानात इमरजंसी लँडिंग झाली होती.

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांत स्पाइसजेट (SpiceJet) ची विमाने वादात सापडली आहेत. काल एका फ्लाईटला पाकिस्तानात उतरववावे लागल्याचा प्रकार ताजा असताना सायंकाळी मुंबईतही एका स्पाईसजेटच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले आहे. त्यानंतर आता आज कोलकात्यातमध्येही तसाच प्रकार घडला आहे. चीनला जाणाऱ्या कार्गो विमानात गडबडी आढळल्यामुळे कोलकत्यात इमरजंसी लँडिंग करावी लागली.

18 दिवसात आठ घटनायाबाबत कंपनीने सांगितले की, त्यांचे एक मालवाहू विमान मंगळवारी चीनला जात होते, पण विमानातील हवामानची माहिती देणारे रडार बिघडल्यामुळे विमान कोलकाता येथे परतले. चीनच्या चोंगकिंग शहराकडे निघालेल्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर रडार काम करत नसल्याचे पायलटच्या निदर्शनास आले. स्पाइसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची गेल्या 18 दिवसांतील ही आठवी घटना आहे. 

DGCA ने स्पाइसजेटला बजावली नोटीस स्पाइसजेटच्या विमानांच्या सततच्या बिघाडानंतर बुधवारी कंट्रोलर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) ने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गेल्या 18 दिवसांत तांत्रिक बिघाडाच्या आठ घटनांनंतर डीजीसीएने हे पाऊल उचलले आहे. स्पाईसजेटच्या DGCA द्वारे सप्टेंबर 2021 च्या ऑडिटमध्ये असे आढळून आले की, स्पेअर्स पुरवठादारांना नियमितपणे पैसे दिले जात नाहीत, ज्यामुळे स्पेअरची कमतरता होती. DGCA ने म्हटले आहे की, स्पाईसजेट विमान नियम, 1937 अंतर्गत सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह हवाई सेवा सुनिश्चित करण्यात अयशस्वी ठरली आहे. 

कंपनी मोठ्या तोट्यातस्पाईसजेट एअरलाईन गेल्या तीन वर्षांपासून तोट्यात आहे. स्वस्त सेवा देणाऱ्या स्पाइसजेटला 2018-19 मध्ये 316 कोटी रुपये, 2019-2020 मध्ये 934 कोटी रुपये आणि 2020-21 मध्ये 998 कोटी रुपयांचा तोटा झाला. विमान वाहतूक क्षेत्र कोरोना महामारीतून सावरत आहे. विमान वाहतूक सल्लागार कंपनी CAPA ने 29 जून रोजी सांगितले की, भारतीय विमान कंपन्यांचा तोटा 2021-22 मध्ये 3 अब्ज डॉलरवरून 2022-23 मध्ये 1.4 ते 1.7 अब्ज डॉलरपर्यंत खाली येऊ शकतो. 

टॅग्स :spicejetस्पाइस जेटairplaneविमानAccidentअपघात