शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

SpiceJet Flight: Spicejetच्या विमानात तांत्रिक बिघाड; श्वास गुदमरल्याने महिला बेशुद्ध, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 15:18 IST

SpiceJet Flight: गेल्या काही महिन्यांपासून स्पाइसजेटच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता परत एकदा कंपनीचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून स्पाईसजेटच्या विमानांमध्ये अनेकदा तांत्रिक त्रुटी आढलून आल्या आहेत. आता पुन्हा एकदा कंपनीचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. रविवारी विमानतळावर उभ्या असलेल्या विमानाच्या आत एसी सुरू न केल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. इतकंच नाही तर श्वास गुदमरुन एक वृद्ध महिला विमानाच्या गेटवर बेशुद्ध पडली. तात्काळ विमानाचे दोन्ही दरवाजे उघडल्यानंतर प्रवाशांनी मोकळा श्वास घेतला. सोशल मीडिया पोस्टमध्ये महिला प्रवाशाने ही घटना समोर आणली आहे.

दिल्लीच्या रहिवासी उषा कांता चतुर्वेदी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये संपूर्ण घटनेचे वर्णन केले आहे. त्यांनी लिहीले की, 'ही घटना 7 ऑगस्ट 2022 रोजी घडली आहे. मुंबईला जाण्यासाठी दिल्लीहून सकाळी 7.20 ला स्पाईसजेटचे विमान निघणार होते. पहाटे 3 वाजता उठून, 4.30 ला घरातून बाहेर पडले आणि 5.30 ला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. आमचे बोर्डिंग वेळेवर झाले आणि आम्ही विमान निघण्याची वाट पाहत बसलोत. पण, विमानात एसी नसल्यामुळे अचानक गर्मी वाढू लागली.' 

'फ्लाइट अटेंडंटना विचारल्यावर उत्तर मिळाले की, इंजिन नुकतेच सुरू झाले आहे, हळूहळू विमान थंड होईल. पण, काही वेळानंतर आतमध्ये गुदमरल्यासारखे वातावरण निर्माण झाले. प्रवासी नाराज झाले आणि त्यांनी फ्लाइट अटेंडंटला बोलावण्यासाठी बेल वाजवण्यास सुरुवात केली, परंतु कोणीही बाहेर येऊन प्रतिदास दिला नाही. ना विमानाने उड्डाण केले ना विमानातील हवेचा दबाव ठीक झाला. विमानाच्या दाराजवळ एक वृद्ध महिला बेशुद्ध होऊन पडली. यानंतर प्लाईट अटेंडंटने विमानाचे दोन्ही बाजूचे दरवाजे उघडले.'

चाचणीशिवाय विमान तयार केले?त्यांनी पुढे सांगितले की, 'या सर्व प्रकारानंतर इंजिन काम करत नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे आम्हा सर्वांना धक्काच बसला. चाचणीशिवाय विमान उड्डाणासाठी कसे तयार केले? असा प्रश्न आम्ही विचारला. प्रवाशांचा संताप आणि बिघडलेली स्थिती पाहून आम्हा सर्वांना बसने परत विमानतळाच्या आत पाठवण्यात आले. कुणाला महत्त्वाच्या मीटिंगसाठी जायचे होते, कुणाला आपल्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्काराला जायचे होते. 11 वाजेपर्यंत विमान टेक ऑफ झाले नाही, अखेर कंटाळून आम्हाला आमची तिकीटे रद्द करावी लागली." दरम्यान, या प्रकरणाबाबत अद्यापपर्यंत स्पाईसजेटकडून कोणतेही विधान आलेले नाही.

इसजेट 50% उड्डाणे सुरूभारतातील विमान कंपन्यांमध्ये तांत्रिक दोष सातत्याने समोर येत आहेत. याच कारणामुळे विमान वाहतूक नियामक डीजीसीएनेही अनेक विमान कंपन्यांवर कारवाई केली आहे. डीजीसीएच्या आदेशानुसार, स्पाइसजेट सध्या 50 टक्क्यांहून अधिक उड्डाणे चालू शकत नाही. विशेष म्हणजे जुलैमध्ये डीजीसीएने 8 आठवड्यांच्या कालावधीसाठी एअरलाइनच्या फ्लाइटवर बंदी घातली होती. याचे कारण म्हणजे 19 जून ते 5 जुलै दरम्यान स्पाइसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाडाच्या किमान आठ घटना घडल्या. 

टॅग्स :spicejetस्पाइस जेटairplaneविमान