राजधानी दिल्लीमधील आदर्शनगर येथे झालेल्या रस्ते अपघाताचा एक भयावह व्हिडीओ समोर आला आहे. येथे एका दुकानाजवळ चार पाच लोक उभे राहून बोलत होते. तेवढ्यात समोरून एक भरधाव काल आली आणि तिने तिथे उभ्या असलेल्या दुचाकींना धडक देत या कारने उभ्या असलेल्या त्या पाच लोकांनाही चिरडले.
कारची ही धडक एवढी जोराची होती की त्यामुळे हे लोक उडून दूरवर जाऊन पडले. या अपघातादरम्यान, एक एक लहान मुलगा कारच्या चाकाखाली सापडला. दरम्यान, कारने धडक दिलेल्या लोकांपैकीच एकाने कारचं चाक उचलून या मुलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात या मुलाची आईसुद्धा तिथे पोहोचली. तसेच तिने आक्रोष करण्यास सुरुवात केली. दरम्यान, आजूबाजूच्या लोकांनीही तिथे धाव घेत जखमी मुलाला बाहेर काढले आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर लोक कारचालकावर संताप व्यक्त करत होते.