शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

सीमेवर तैनातीआधी सैनिकांना विशेष प्रशिक्षण!

By admin | Updated: April 8, 2016 03:03 IST

भारतीय भूदलाची तैनाती सध्या दोन विभागांत होते. शांतता क्षेत्र आणि युद्धक्षेत्र. देशाच्या अंतर्गत भागांतील लष्करी छावण्यांना

संकेत सातोपे,  जम्मूभारतीय भूदलाची तैनाती सध्या दोन विभागांत होते. शांतता क्षेत्र आणि युद्धक्षेत्र. देशाच्या अंतर्गत भागांतील लष्करी छावण्यांना शांतता क्षेत्र, तर जम्मू- काश्मीर, सियाचीनसारख्या अस्वस्थ सीमांना युद्धक्षेत्र म्हणण्यात येते. जवानापासून ते उच्चपदस्थापर्यंत प्रत्येकाला तीन वर्षे युद्धक्षेत्रात आणि तीन वर्षे शांतता क्षेत्रात तैनात करण्यात येते. मात्र, युद्धक्षेत्रात तैनात करण्यात येण्यापूर्वी प्रत्येक सैनिकाला विशेष प्रशिक्षण देण्यात येते. एलओसीलगतच चालणारे हे अत्यंत कठोर प्रशिक्षण जम्मू दौऱ्यातील पत्रकारांना पाहता आले.शांतता क्षेत्रातून आलेल्या सैनिकाला सीमेवर उभे राहण्यासाठी शारीरिक आणि मानिसकदृष्ट्या तयार करण्याचे काम ‘बॅटल स्कूल’मध्ये करण्यात येते. त्या-त्या भागातील सीमेवरील समस्या आणि आव्हानांची माहिती करून देत जवानांना तेथील भूगोल आणि वातावरणासाठी तयार केले जाते. लष्कराच्या सादर्नत कमांडमध्ये अशी चार बॅटल स्कूल आहेत.जम्मू भागात सरोल येथे हे ‘बॅटल स्कूल’ आहेत. येथे एकाच वेळी १,८०० ते १,९०० जवानांना प्रशिक्षण देण्यात येते. दोन्ही खांद्यांचा वापर करून बंदूक चालविणे, अचूक लक्ष्यभेद करणे, अडथळ्यांची शर्यत आदी अनेक गोष्टी त्यांच्याकडून करून घेतल्या जातात. येथे प्रत्येक जवानाची वैद्यकीय चाचणी केली जाते. तसेच मानसशास्त्रांकडून त्यांचे समुपदेशन करण्यात येते, यात उत्तीर्ण होणाऱ्यांनाच पुढे सीमेवर तैनात केले जाते. या युद्ध प्रशिक्षणामुळे सीमेवर होणारे मृत्यू आणि आत्महत्यांचे प्रमाण खूपच कमी करण्यात यश आल्याचे प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुखांनी ‘लोकमत’ला सांगितले.शत्रूकडून वापरण्यात येणारी शस्त्रास्त्रे, भूसुरुंग, आयईडी आदींचे प्रकार ते ओळखण्याची आणि निकामी करण्याची पद्धत प्रात्यक्षिकांद्वारे शिकविण्यात येते. ‘मोअर स्वेट इन पीस, लेस ब्लड इन वॉर’ हे या प्रशिक्षण केंद्राचे ब्रीद आहे. त्यानुसार येथे जवानांकडून दिवस-रात्र घाम गाळून घेण्यात येतो. त्याचेच सकारात्मक परिणाम सीमेवरील लष्करी कारवायांमध्ये दिसून येत आहेत.सीमेवर गस्त घालण्याच्या दृष्टिकोनातून जवानांना वेगवेगळ््या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यात ‘सेन्सिंग द डेंजर’ या प्रशिक्षणाचाही समावेश आहे. यात जवानाला जंगलात नेऊन आवाज, प्रकाश किंवा अन्य गोष्टींच्या माध्यमातून घुसखोरांच्या हालचालींचा सुगावा घ्यायला शिकविले जाते.