शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

बँकांचे कर्ज बुडवून पळालेला विजय मल्ल्या फरार घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 15:56 IST

कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्याला विशेष PMLA कोर्टाकडून 'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून घोषित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देविजय मल्ल्या 'फरार आर्थिक गुन्हेगार' घोषित, मालमत्ता जप्त करण्याचा सरकारला मिळू शकतो अधिकार प्रत्यार्पणासाठी अधिक कालावधी वाढवून देण्याची मागणीही कोर्टानं फेटाळली मल्ल्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याचे ब्रिटन सरकारला आदेश

नवी दिल्ली -  कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्याला विशेष PMLA कोर्टाकडून 'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून घोषित करण्यात आले आहे. ईडीची याचिका विशेष PMLA कोर्टानं स्वीकारली आहे. यामुळे मल्ल्याच्या मालमत्तेवर टाच आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय, मल्ल्याकडून  प्रत्यापर्णासाठी काही कालावधी देण्याचीही मागणीही पीएमएलए कोर्टानं फेटाळली आहे. वेस्टमिनस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टानं ब्रिटन सरकारला मल्ल्याचे भारताकडे प्रत्यापर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता मल्ल्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

'फरार आर्थिक गुन्हेगार' कोणाला ठरवतात ?नवीन कायद्यांतर्गत, ज्यांना 'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून घोषित केले जाते, त्यांची मालमत्ता तातडीनं जप्त केली जाते. गुन्हा केल्याबाबत ज्याच्याविरोधात अटक वॉरंटही जारी केले जाते, त्यास 'फरार आर्थिक गुन्हेगार' ठरवले जाते. कायदेशीर कारवाईविरोधात स्वतःचा बचाव करण्यासाठी या व्यक्ती भारतातून परदेशात पळ काढतात. नंतर भारतवापसी करण्यास टाळाटाळही करतात. या अध्यादेशा अंतर्गत 100 कोटी रुपयांहून अधिक रक्कमेची फसवणूक, कर्जाची डिफॉल्ड यांसारखी प्रकरणे येतात.  

('वाल्याचा वाल्मीकी करणारे मल्ल्याचाही वाल्मीकी करतील')

(मल्ल्या घोटाळेबाज कसा?; गडकरींनी केला 'त्या' विधानाचा खुलासा)

‘किंगफिशर एअरलाइन्स’च्या नावे घेतलेली बँकांची सुमारे 9,000 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विजय मल्ल्या इंग्लंडमध्ये पसार झाला आहे. मल्ल्या देशाबाहेर पळून गेल्याने भारत सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. तेव्हापासून मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. 

दरम्यान, भारत व ब्रिटन यांच्यात सन १९९३ मध्ये प्रत्यार्पण करार झाल्यापासून भारतास फक्त एकाच आरोपीचे ब्रिटनमधून प्रत्यार्पण करून घेण्यात यश आले आहे. गुजरातमधील सन २००२च्या दंगलींतील आरोपी समिरभाई विनुभाई पटेल याचे ऑक्टोबर २०१६ मध्ये प्रत्यार्पण केले गेले होते.

ऑर्थर रोड जेलची बॅरेक :भारतातील तुरुंग सुरक्षित नाहीत. तेथे कैदी कोंबल्याने जीव गुदमरतो. यामुळे मानवी हक्कांचे उल्लंघन होईल, असाही मुद्दा मल्ल्याने मांडला. भारत सरकारने मल्ल्यासाठी मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहातील बरॅक क्र. १२ ची निवड केली व त्या बरॅकचा व्हिडीओही सादर केला. त्यातून मोठ्या खिडक्यांमुळे भरपूर उजेड व हवा मिळेल. शिवाय बरॅकच्या आवारात मल्ल्याला फेरफटकाही मारता येईल. त्याच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व टीव्ही असेल व ग्रंथालयाचाही त्याला वापर करता येईल, हे सरकारने सांगितले. परंतु मल्ल्याने या व्यवस्थेलाही नाके मुरडली.

 

 

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय