सायबर क्राईम तपासासाठी विशेष ॲप मुख्यमंत्र्यांनी केले उद्द्याटन
By Admin | Updated: July 31, 2015 23:03 IST2015-07-31T23:03:17+5:302015-07-31T23:03:17+5:30
सायबर क्राईम तपासासाठी विशेष ॲप

सायबर क्राईम तपासासाठी विशेष ॲप मुख्यमंत्र्यांनी केले उद्द्याटन
स यबर क्राईम तपासासाठी विशेष ॲपमुख्यमंत्र्यांनी केले उद्द्याटनमुंबई - सायबर क्राईम तपास करण्यासाठी कॉलॅब्रेटीव्ह ऑनलाईन नेटवर्क(कॉईन) या ॲपचा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच वरळी येथे पार पडलेल्या सायबर क्राईम याविषयावरील राष्ट्रीय परिषदेत केला. करण्यात आला. मुंबई पोलीस व एशिअन स्कूल ऑफ सायबर लॉ यांनी हे ॲपलीकेशन तयार केले आहे. याने सायबर क्राईमचा छडा लावण्यात पोलिसांना अधिक मदत होईल. डीजीटल पुरावा असलेल्या प्रकरणातही याचा उपयोग होणार आहे. या ॲपलीकेशनचा वापर जगभरात कोणालाही करता येणार असल्याने इतर देशासोबत संपर्कात राहून पोलिसांना गुन्ाची उकल करता येईल.वरळी येथे सायबर क्राईमबाबत राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी याचा शुभारंभ केला. यावेळी ते म्हणाले, आपण आरोपींच्या पुढे असायला हवे. अन्यथा आरोपी प्रशासनाचा ताबा घेतली. आणिा आता पोलिसांनी अत्याधुनिक झालेच पाहिजे. तसेच बँकींग सेक्टरमध्ये सायबर क्राईम वाढला असून ही समस्या गंभीर आहे. हे रोखण्यासाठी अधिक काम करणे आवश्यक आहे. यावेळी पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी या ॲपलीकेशनमध्ये काय आहे हे सांगितले.