चार्जिंगदरम्यान मोबाईलवर बोलणे प्राणावर बेतले
By Admin | Updated: December 21, 2014 02:19 IST2014-12-21T02:19:56+5:302014-12-21T02:19:56+5:30
येथील कोरमा जिल्ह्यातील नैनवा भागात राहणारा युवक चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर बोलत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाला.

चार्जिंगदरम्यान मोबाईलवर बोलणे प्राणावर बेतले
बुंदी : येथील कोरमा जिल्ह्यातील नैनवा भागात राहणारा युवक चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर बोलत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाला. या घटनेत हा युवक ठार झाला. राजूलाल गुर्जर असे युवकाचे नाव आहे.
राजूलाल चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर बोलत असताना मोबाईलचा स्फोट झाला. यात राजूलालच्या छातीसह हाताला जखमा झाल्या. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
डॉ. सामंदर लाल मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार या युवकाला अर्धवट जळालेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या युवकाचा मृत्यू विजेचा धक्का लागून व जळाल्याने झाल्याचे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)