मिहानच्या प्रश्नांवर लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा पालकमंत्री: प्रकल्पग्रस्तांशी केली चर्चा
By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:36+5:302015-01-31T00:34:36+5:30
फोटो ओळी-(30 मिहान मिटिंग या नावाने रॅपमध्ये आहे) प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करताना पालकमंत्री चंद्रशखर बावनकुळे

मिहानच्या प्रश्नांवर लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा पालकमंत्री: प्रकल्पग्रस्तांशी केली चर्चा
फ टो ओळी-(30 मिहान मिटिंग या नावाने रॅपमध्ये आहे) प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करताना पालकमंत्री चंद्रशखर बावनकुळेनागपूर: मिहान प्रकल्पाच्या प्रलबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून ते मार्गी लावले जातील , असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.बावनकुळे यांनी शुक्रवारी खापरीमधील मिहान कार्यालयात प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला तसेच प्रकल्पग्रस्तांसोबत चर्चा केली. मिहानमध्ये काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या सेवा नागपूर सुरक्षा रक्षक मंडळाकडे संलग्नित करण्यात आलेल्या आहेत. त्यांना मिहानमध्ये काम मिळावे यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल तसेच कलकुही, तेल्हारा,दहेगाव व खापरी येथील ज्या प्रकल्पग्रस्तांना भूखंड देण्यात आले त्यांना घरे बांधून देण्याच्या प्रस्तावावर विचार केला जाईल. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांना अर्ज करावा लागेल. मिहानच्या विविध प्रश्नांवर पुढील आठवड्यात मुंबई येथे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न सोडवण्यात येईल, असे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. खापरी रोडलगत एचपीसीएल ऑईल कंपनीला इतरत्र हलविण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मौजा खापरी रेल्वे गावठाणातील ३.२२ हेक्टर जमीन संपादित करण्यासाठी मान्यता मिळाली असून या कामासाठी १०० कोटी रुपये शासनाकडून लवकरच मंजूर करुन आणले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.बैठकीला जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, मिहानचे मुख्य अभियंता एस.व्ही.चहांदे, पुनर्वसन अधिकारी प्रकाश पाटील, भूसंपादन अधिकारी अशोक चौधरी, उपजिल्हाधिकारी आशा पठाण, रमण जैन, निशिकांत सुके, गिरीश जोशी उपस्थित होते. चौकट करावीशासनाकडे पाठविलेले प्रस्ताव-१.७१ हेक्टर जमीन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस हस्तांतरित करणे-खापरीतील ५९ घरांसाठी सानुग्रह अनुदान-चिंचभवन, खापरीतील दुकाने व व्यापारी संकुलासाठी जागा देणे