शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

"राहुल गांधींनी लग्न करावं, आम्ही वऱ्हाडी होऊ, तुमची मम्मी...", लालूप्रसाद यादवांच्या विधानानं हशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 18:10 IST

opposition party meeting in patna : आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी आज बिहारमध्ये विरोधी पक्षांची बैठक पार पडली.

पाटणा : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी बिहारची राजधानी पाटणा येथून विरोधकांनी एकजुटीचा नारा दिला. आज झालेल्या बैठकीत देशातील १५ राजकीय पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेतून विरोधकांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले. अशातच राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी राहुल गांधींचे कौतुक करताना एक विधान केले, ज्याने सर्वांनाच हशा पिकला. 

पत्रकार परिषदेत बोलताना लालू यादव म्हणाले, राहुल गांधी सध्या चांगले काम करत आहेत. पण त्यांनी दाढी कमी करायला हवी. तसेच त्यांनी लवकर लग्न करावे, आम्ही वऱ्हाडी म्हणून येऊ. "राहुल गांधींची मम्मी सांगायची की, त्याला लग्न करायला सांगा तो माझं ऐकत नाही", असे लालू यादवांनी म्हणताच एकच हशा पिकला. 

मोंदींवर साधला निशाणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना लालू यादव यांनी म्हटले, "आता मी पूर्णपणे तंदुरूस्त असून पंतप्रधान मोदी अमेरिकेत चंदनाचे लाकूड वाटत आहेत. आगामी निवडणूक एकजुटीने लढायची आहे. एकत्र पुढे जायचे आहे. बेरोजगारी आणि महागाईची स्थिती काय आहे? सरकार हिंदू-मुस्लिम युद्ध घडवण्यात गुंतले आहे. वाढती बेरोजगारी काळजीत टाकणारी आहे आणि महागाई शिखरावर आहे. आता हनुमानजी आमच्यासोबत आहेत. भाजपची अवस्था फार वाईट होणार आहे. कर्नाटकात हनुमानजींनी भाजपला झटका दिला आहे. यावेळी भाजपची वाईट अवस्था निश्चित आहे. कारण आता हनुमानजी आमच्यासोबत आहेत."

दिग्गज नेत्यांची उपस्थितीदरम्यान, विरोधकांच्या बैठकीला कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, सीताराम येचुरी, डी राजा यांसह इतरही काही नेत्यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :BiharबिहारRahul Gandhiराहुल गांधीLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवcongressकाँग्रेस