CAA विरोधात भाषण देताना खासदाराची पँट घसरली, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 20:34 IST2020-01-20T20:34:16+5:302020-01-20T20:34:29+5:30
बिहारच्या अरेरिया येथे राष्ट्रीय जनता दलाचे राज्यसभा खासदार अश्फाक करीम यांची पँट

CAA विरोधात भाषण देताना खासदाराची पँट घसरली, व्हिडीओ व्हायरल
रांची - राष्ट्रीय जनता दलाचे खासदार अश्फाक करीम यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला भाजपा समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. अश्फाक करीम हे नागरिकता संशोधन कायद्याविरोधात भाषण देते होते. त्याचवेळी, खासदार करीम यांची पँट घसरली. यावेळी, त्यांनी आपली पँट अंगावर चढवून पुन्हा भाषणला सुरुवात केली. मात्र, खासदार महोदयांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
बिहारच्या अरेरिया येथे राष्ट्रीय जनता दलाचे राज्यसभा खासदार अश्फाक करीम यांची पँट खाली घसरल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एनआरसी आणि सीएए विरोधात करीम भाषण देत होते. त्यावेळी, अचानक त्यांची पँट सैल होऊन खाली घसरली. त्यामुळे त्यांच्यावर नामुष्की ओढवल्याचं दिसून आल. मात्र, तरीही त्यांनी जोरदारपणे आपलं भाषण सुरुच ठेवलं. सीएए आणि एनआरसी कायदा नागरिकांसाठी त्रासदायक आणि लोकशाहीविरोधी असल्याचे ते उपस्थित लोकांना पटवून देत होते.
खासदार महोदयांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून भाजपा समर्थकांकडून त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. दरम्यान, देशभरात सीएए कायद्याविरोधात मोठं आंदोलन छेडण्यात आलं असून भाजपा नेत्यांकडूनही या कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढून सभा घेण्यात येत आहेत.