शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सपा महिलांना देणार नोकरीत ३३% आरक्षण; भाजपच्या जाहीरनाम्यातही युवक, महिलांसाठी मोठमोठ्या योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 08:15 IST

‘समाजवादी वचन पत्र’ या नावाने जारी केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यात  महिलांना सरकारी नोकरीत ३३% आरक्षण, शेतकरी, युवक,महिलांसह सामान्य जनतेसाठी अनेक आकर्षक आश्वासने दिली आहेत.

राजेंद्र कुमार -

लखनौ : समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी ‘समाजवादी वचन पत्र’ या नावाने जारी केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यात  महिलांना सरकारी नोकरीत ३३% आरक्षण, शेतकरी, युवक,महिलांसह सामान्य जनतेसाठी अनेक आकर्षक आश्वासने दिली आहेत.

समाजवादी वचन पत्रातील ठळक मुद्दे....-    सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज.-    बिनव्याजी कर्ज, विमा-पेन्शची व्यवस्था.-    सर्व अल्प-अत्यल्प भूधारकांना दोन गोणी डीपीए, पाच गोणी युरिया मोफत.-    सर्व पिकांसाठी किमान हमी भाव (एमएसपी).-    शेतकऱ्यांना पंधरात दिवसांत उसाचे पैसे.-    शेतकरी आंदोलनांतील शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची मदत.-    महिलांना सरकारी नोकरीत ३३ टक्के आरक्षण.-    दारिद्र्य रेेषेखालील कुटुंबाला २ मोफत सिलिंडर.-    अर्बन रोजगार हमी कायदा करणार.-    मुलींसाठी केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण.-    बारावी पास झाल्यानंतर मुलींना एकरकमी ३६ हजार रुपये.-    बारावी पास सर्व विद्यार्थ्यांना लॅपटॉप.-    दरवर्षी १८००० रुपयांंचे समाजवादी पेन्शन.

भाजप देणार मोफत स्कुटी, लॅपटॉप; लव जिहाद रोखण्यासाठी १० वर्षे तुरुंगवास -भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी जारी केेलेल्या जाहीरनाम्यात शेतकरी, ग्रामीण, युवक आणि महिलांसाठी मोठमोठ्या योजनांसह  सर्वांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनांचा वर्षाव करण्यात आला आहे.   ‘लोक कल्याण संकल्प पत्र’ या नावाने भाजपने  जारी केलेल्या  निवडणूक जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे.

-    पुढील ५ वर्षे सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज.-    शेतकऱ्यांना  १४ दिवसांत उसाची रक्कम देणार.-    प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी-    व्यावसायिक सुलभीकरणात राज्य करणार अग्रणी.-    पुढील पाच वर्षांत १० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट.-    माँ अन्नपूर्णा कॅन्टीन स्थापन करून गरिबांना स्वस्त भोजन.-    लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ प्रायोगिक अकादमी.-    ठाण्यात सायबर हेल्प डेस्क.-    सर्वांसाठी निर्धारित अवधीत मिळणार ३३९ सरकारी सुविधा.-    मेरठ, रामपूर, आझमगढ, कानपूर, बहराईचमध्ये दहशतवादीविरोधी कमांडो सेंटर.-    कन्या सुमंगल योजनेत १५ ते २५ हजार रुपये.-    अत्यल्प-अल्प भूधारक शेतकऱ्यांना दुप्पट शेतकरी सन्मान निधी.-    यूपीएससीसह सरकारी नोकरीत महिलांना दुप्पट प्रतिनिधित्व.-    काशी, मेरठ, गोरखपूर, बरेलील झांशी, प्रयागराजमध्ये मेट्रो.-    ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तीस १५०० रुपये पेन्शन.-    प्रत्येक विभागात किमान एक विद्यापीठ.-    ॲम्ब्युलन्स आणि एमबीबीएसच्या जागा दुप्पट करणार.-    हुशार विद्यार्थिनींना मोफत स्कूटी,  हुशार विद्यार्थ्यांना  लॅपटॉप/टॅब्लेट/स्मार्टफोन.-    ६ हजार डॉक्टर, १० हजार  पॅरा मेडिकल कर्मचाऱ्यांची नियुक्ती.-    लव जिहाद रोखण्यासाठी १० वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपयांचा दंड.-    तीन अत्याधुनिक डाटा सेंटर पार्क.-    कानपूरमध्ये मेगा लेदर पार्क.-    ६० वर्षांवरील महिलांंना मोफत बसप्रवास.-    उज्ज्वला लाभार्थ्यांना दिवाळीला दोन मोफत सिलिंडर. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीWomenमहिला