अखेर सपा-बसपामधील जागावाटप ठरले, लढवणार प्रत्येकी एवढ्या जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 16:39 IST
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या घोडदौडीला लगाम घालण्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी सर्व मतभेद विसरून महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला होता.
अखेर सपा-बसपामधील जागावाटप ठरले, लढवणार प्रत्येकी एवढ्या जागा
ठळक मुद्देभाजपाच्या घोडदौडीला लगाम घालण्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी सर्व मतभेद विसरून महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला होताआज सपा आणि बसपामधील जागावाटप जाहीर झाले आहे. या जागावाटपानुसार बसपा 38 तर सपा 37 जागांवर लढणार पश्चिम उत्तर प्रदेशमधील अधिकाधिक जागा समाजवादी पक्षाला सोडण्यात आल्या आहेत, तर पूर्व उत्तर प्रदेशमधील बहुतांश जागा मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला
लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या घोडदौडीला लगाम घालण्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी सर्व मतभेद विसरून महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, महाआघाडीची घोषणा होऊन महिना उलटला तरी दोन्ही पक्षांमधील जागावाटपाची घोषणा झाली नव्हती. अखेर आज सपा आणि बसपामधील जागावाटप जाहीर झाले आहे. या जागावाटपानुसार बसपा 38 तर सपा 37 जागांवर लढणार असून, उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सपा आणि बसपामध्ये ठरलेल्या जागावाटपाच्या सूत्रानुसार दोन्ही पक्षांनी उत्तर प्रदेशमधील 80 जागांपैकी काही जागा मित्रपक्षांना सोडून उर्वरित जागांचे आपसात वाटप केले आहे. त्यानुसार सपा 37 तर बसपा 38 जागांवर लढेल. सपा-बसपा महाआघाडीने अमेठी आणि रायबरेलीच्या जागा काँग्रेसला सोडल्या आहेत. तर मथुरा, बागपत आणि मुझफ्फरनगरच्या जागा राष्ट्रीय लोकदल पक्षाला देण्यात आल्या आहेत.
आज जाहीर झालेल्या जागावाटपामध्ये पश्चिम उत्तर प्रदेशमधील अधिकाधिक जागा समाजवादी पक्षाला सोडण्यात आल्या आहेत, तर पूर्व उत्तर प्रदेशमधील बहुतांश जागा मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला देण्यात आल्या आहेत. दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या जागावाटपामध्ये अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षित असलेल्या जागांवर बसपाला झुकते माप देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधील 80 पैकी 17 जागा ह्या अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षित आहेत. त्यापैकी 10 जागांवर बसपा लढणार आहे, तर समाजवादी पक्ष 7 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. तसेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर समाजवादी पक्षाला विजय मिळाला होता, अशा जागा समाजवादी पक्षालाच सोडण्यात आल्या आहेत.
उत्तर प्रदेशमधील 80 जागांपैकी 37 जागा समाजवादी पक्ष लढवणार आहे. त्या 37 जागा पुढीलप्रमाणे
उत्तर प्रदेशमधील 80 जागांपैकी 38 जागा बहुजन समाज पक्ष लढवणार आहे. त्या 38 जागा पुढीलप्रमाणे