एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 07:01 IST2020-08-17T05:00:26+5:302020-08-17T07:01:42+5:30
प्रख्यात पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या पत्नी सावित्री यांनाही कोरोनाची बाधा झाल्याने रुग्णालयात दाखल केले आहे.

एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा
चेन्नई : प्रख्यात पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या पत्नी सावित्री यांनाही कोरोनाची बाधा झाल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. याआधीच कोरोना संसर्गामुळे बालसुब्रमण्यम यांच्यावर येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सावित्री यांचीही नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आली होती. बालसुब्रमण्यम यांचे पुत्र एस. पी. चरण यांनी सांगितले की, एस. पी. बालसुब्रमण्यम यांना कोरोनाची मध्यम लक्षणे जाणवत आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले नसून ते उपचारांना योग्य प्रतिसाद देत आहेत. (वृत्तसंस्था)