वाढदिवशी सपा नेत्याने मुलायम सिंगना दिली 'श्रद्धांजली'
By Admin | Updated: November 23, 2015 12:28 IST2015-11-23T11:50:15+5:302015-11-23T12:28:38+5:30
सपा नेते बन्सीधर राज यांनी सपा प्रमुख मुलायम सिंग यांच्या वाढदिवशीच त्यांच्या फोटोला हार घालत त्यांना श्रद्धांजली वाहिल्याचा अजब प्रकार घडला आहे.

वाढदिवशी सपा नेत्याने मुलायम सिंगना दिली 'श्रद्धांजली'
>ऑनलाइन लोकमत
लखीमपूर-खीरी ( उत्तर प्रदेश), दि. २३ - समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव यांचा वाढदिवस उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, पक्ष कार्यकर्त्यांनी नेताजींच्या वाढदिवसाचे दणक्यात सेलिब्रेशनही केले. मात्र त्याच उत्साहात लखीमपूर येथे सपा नेते बन्सीधर राज यांनी चक्क मुलायम सिंह यांच्या फोटोला हार घालत त्यांना वाढदिवशीच श्रद्धांजली वाहिल्याचे वृत्त एका हिंदी वृत्तपत्राने दिले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी हा फोटो आपल्या फेसबूक अकाऊंटवरही टाकला होता, मात्र त्यावरून गदारोळ सुरू झाल्यावर एफबीवरून तो फोटो हटवण्यात आला.
शहरातील लोहिया सदन येथे जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा तेथे आमदार उत्कर्ष वर्मा आणि जिल्हाध्यक्ष अनुराग पटेल यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. मुलायम सिंह यांचा वाढदिवसामुले खुश असलेल्या बन्सीधर राज यांच्याकडून अतिउत्साहामुळे चुकून ही घटना घडल्याचे सांगत सपा नेत्यांनी त्यांच्या चुकीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान राज्यातील जनता दुष्काळामुळे उपाशी असताना शाही थाटात वाढदिवस साजरा करणारे मलायम सिंग यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.