दक्षिणेकडील राज्यांत निवडणूक प्रक्रिया सुरू

By admin | Published: April 23, 2016 02:43 AM2016-04-23T02:43:44+5:302016-04-23T02:43:44+5:30

निवडणूक आयोगाने १६ मे रोजी होणाऱ्या तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी अधिसूचना जारी केली.

In the southern states, the election process started | दक्षिणेकडील राज्यांत निवडणूक प्रक्रिया सुरू

दक्षिणेकडील राज्यांत निवडणूक प्रक्रिया सुरू

Next

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने १६ मे रोजी होणाऱ्या तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी अधिसूचना जारी केली. या सोबतच या तीनही राज्यांमध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
विधानसभेच्या तामिळनाडूत २३४, केरळात १४० आणि पुडुचेरीच्या ३० जागांसाठी आता नामांकने दाखल केली जातील. नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख २९ एप्रिल असून ३० एप्रिलला अर्जांची छाननी होईल. २ मेपर्यत अर्ज मागे घेता येणार असून मतमोजणी १९ मे रोजी होईल. केरळात ६५,००० मतदान केंद्रे आहेत. तामिळनाडूत ६५, ६१६ तर केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीत ९३० मतदान केंद्रे राहणार आहेत.

Web Title: In the southern states, the election process started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.