शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

देशांतर्गत उड्डाणांसाठी आता लागणार नाही बोर्डिंग पास, चेहरा पुरेसा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 10:21 AM

देशांतर्गत तुम्ही हवाई प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे.

नवी दिल्ली- देशांतर्गत तुम्ही हवाई प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. आता देशांतर्गत प्रवासादरम्यान बोर्डिंग पासची गरज लागणार नाही. लवकरच या व्यवस्थेची अंमलबजावणी होणार आहे. प्रवाशांना विमानतळावर बोर्डिंग पासशिवाय प्रवेश देण्यासाठी केंद्र सरकार चेह-याच्याद्वारे ओळख पटवण्याची व्यवस्था लागू करणार आहे. बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून चेह-याद्वारे ओळख पटवून आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. सुरुवातीला ही व्यवस्था दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूतील विमानतळांवर लागू केली जाणार आहे. तसेच विमानतळ प्राधिकरणाकडून ही व्यवस्था वाराणसी, विजयवाडा, पुणे आणि कोलकाता विमानतळावर लागू करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया डिजिटलच्या माध्यमातून राबवली जाणार असून, येत्या 5 ते 6 महिन्यांत विमानतळ प्राधिकरण ही व्यवस्था भारतातल्या 4 विमानतळांवर लागू करणार आहे.त्यानंतर इतर विमानतळांवरही या सुविधेचा विस्तार करण्यात येणार आहे. डोळे आणि अंगठ्याऐवजी चेह-यानं प्रवाशांची ओळख पटवण्याची व्यवस्था सरकार करणार आहे. हा नियम जगभरात लागू असून, चेहरा हे स्कॅनिंगच्या माध्यमातून ओळख पटवण्याचं प्रभावी माध्यम आहे.