शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

Sonu sood :सोनू सूदविरोधात एफआयआर दाखल, मतदानाच्या दिवशी बहिणीचा प्रचार केल्याचा आरोप

By parabhanihyperlocal | Published: February 22, 2022 2:33 PM

Sonu sood :सोनूची बहीण मालविका सूद-सच्चर मोगामधून काँग्रेसच्या उमेदवार आहेत. निवडणुकीत सोनूने मालविकासाठी खूप प्रचार केला होता.

मोहाली: पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान सोनू सूद मतदान केंद्रावर दिसल्यानंतर पंजाब पोलिसांनी त्याची कार जप्त केली होती. त्यानंतर आता सोनू सूदविरोधात FIR नोंदवण्यात आला आहे. त्याच्यावर मतदानाच्या दिवशी मोगातील लांडेके गावात बहिणीसाठी प्रचार केल्याचा आरोप आहे. सोनूविरोधात कलम-188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ई टाइम्सच्या रिपोर्टनुसार, सोनू सध्या दक्षिण आफ्रिकेत एका इव्हेंटसाठी गेला आहे.

सोनूची कार जप्तसोनूची बहीण मालविका सूद-सच्चर मोगामधून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. सोनू मतदारांवर प्रभाव टाकत असल्याची तक्रार आल्यानंतर निवडणूक आयोगाने त्याला मोगा येथील मतदान केंद्रावर जाण्यास मनाई केली होती. पण, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात गेल्यामुळे पोलिसांनी सोनूची कार जप्त केली होती. 

सोनूची प्रतिक्रियासोनूने मात्र मतदान केंद्रावर निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते. एएनआयशी बोलताना सोनू म्हणाला, “आम्हाला विरोधकांकडून अनेक धमकीचे फोन आले होते. अनेक बूथवर पैसेही वाटले जात होते, त्यामुळे निवडणूक योग्य पद्धतीने पार पडली आहे का, हे पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्यानंतर आता सोनूविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. यावर अद्याप सोनूची प्रतिक्रिया आलेली नाही.

सोनूचे आगामी चित्रपटसोनू आगामी काळात आचार्य, थमिलरासन या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय तो पृथ्वीराज आणि फतेह या हिंदी चित्रपटांमध्येही दिसणार आहे. पृथ्वीराजमध्ये सोनूसोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच मानुषी छिल्लर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 

टॅग्स :Sonu Soodसोनू सूदPunjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२