श्रीगोंद्यात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ महिलेचे कान तोडले; पाटोद्याच्या भामट्यास पकडले

By Admin | Updated: August 17, 2015 22:38 IST2015-08-17T22:38:41+5:302015-08-17T22:38:41+5:30

श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील आठवडे बाजाराचा मुहूर्त साधत श्रीगोंदा बसस्थानक व घोडेगाव शिवारात सोनसाखळी चोरणार्‍या टोळीने सुमारे २ लाख ५० हजार किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. चंद्रकला अंकुश भुजबळ (रा.घोडेगाव) या महिलेचे कान तोडले.

Sonjakali broke the ears of a thief in Shrigonda; Patodiya's bhumta caught | श्रीगोंद्यात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ महिलेचे कान तोडले; पाटोद्याच्या भामट्यास पकडले

श्रीगोंद्यात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ महिलेचे कान तोडले; पाटोद्याच्या भामट्यास पकडले

रीगोंदा : श्रीगोंदा येथील आठवडे बाजाराचा मुहूर्त साधत श्रीगोंदा बसस्थानक व घोडेगाव शिवारात सोनसाखळी चोरणार्‍या टोळीने सुमारे २ लाख ५० हजार किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. चंद्रकला अंकुश भुजबळ (रा.घोडेगाव) या महिलेचे कान तोडले.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिवाजी मरीबा गायकवाड (रा.पाटोदा) या भामट्यास पुणे-जामखेड बसमध्ये चढत असताना पकडले आणि धुलाई करून पोलिसांच्या ताब्यात दिले. या भामट्याकडे दीड तोळ्याची एक सोनसाखळी सापडली. सोमवारी श्रीगोंदा बसस्थानकावर पाटोद्याच्या भामट्याने शांताबाई सावंत फुले (रा.पारगाव, ता.आष्टी) व स्वाती बाबासाहेब डेबरे (रा.वेळू) या महिलांचे गळ्यातील ६ तोळे सोन्याचे दागिने तोडले. त्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थी भानुदास गुंड (रा.श्रीगोंदा फॅक्टरी) याची दीड तोळ्याची सोनसाखळी कापली असता विद्यार्थ्यांच्या सतर्कतेमुळे पाटोद्याचा भामटा जाळ्यात सापडला. पोलिसांनी शिवाजी गायकवाडला अटक केली.

घोडेगावात महिलेचे कान तोडले
घोडेगाव येथील चंद्रकला अंकुश भुजबळ ही महिला श्रीगोंदा येथे आठवडे बाजारसाठी जात असताना तिघा भामट्यांनी मोटारसायकलवरून या महिलेचा पाठलाग केला आणि चंद्रकलाबाईचे दागिन्यासाठी कान तोडले. दोन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. पुढील तपास फौजदार अशोक उर्किडे करीत आहेत.

Web Title: Sonjakali broke the ears of a thief in Shrigonda; Patodiya's bhumta caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.