आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 21:14 IST2024-05-28T21:13:40+5:302024-05-28T21:14:03+5:30
Sonipat Factory Boiler Blast News :हरियाणामधील सोनीपत येथील औद्योगिक क्षेत्रात रबर बनवणाऱ्या एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. अचानक झालेल्या स्फोटामुळे काही समजण्याआधीच येथे काम करणारे कामगार होरपळले. सुमारे ४० कामगार जखमी झाले असून, त्यामधील ८ जणांची प्रकृती गंभीर आहे.

आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
हरियाणामधील सोनीपत येथील औद्योगिक क्षेत्रात रबर बनवणाऱ्या एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. अचानक झालेल्या स्फोटामुळे काही समजण्याआधीच येथे काम करणारे कामगार होरपळले. सुमारे ४० कामगार जखमी झाले असून, त्यामधील ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच सोनीपतचे प्रशासन आणि डीसी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी निष्पक्ष तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल, सोनीपतच्या डीसींनी सांगितले आहे.
राई औद्योगिक क्षेत्रातील सांवरिया एक्सपोर्ट्स नावाच्या कंपनीमध्ये रबर बेल्ट बनवण्याचं काम चालतं. आज या फॅक्टरीमध्ये अचानक बॉयलरचा स्फोट झाला. या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या मजुरांबरोबरच बाजूच्या कंपनीतील कामगारही या स्फोटाच्या कचाट्यात सापडले. यात एका महिलेसह ४० कामगार होरपळले. त्यामधील ८ कामगारांची प्रकृती गंभीर आहे.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आसपासच्या लोकांच्या मदतीने पोलिसांनी सर्व जखमींना सोनीपतमधील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. तर आठ कामगारांना रोहतक येथील पीआयजी येथे उपचारांसाठी पाठवण्यात आलं आहे. इतरांवर सोनीपत येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनास्थळी काम करत असलेल्या कामगारांच्या सहकाऱ्याने अचानक स्फोट झाल्याचे सांगितले.