सोनियांच्या खांद्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, प्रकृतीत सुधारणा

By Admin | Updated: August 5, 2016 05:42 IST2016-08-05T05:42:25+5:302016-08-05T05:42:25+5:30

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या खांद्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

Sonia's successful surgery on shoulder, improvement in the condition | सोनियांच्या खांद्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, प्रकृतीत सुधारणा

सोनियांच्या खांद्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, प्रकृतीत सुधारणा

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या खांद्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना अतीव दक्षता कक्षातून सामान्य कक्षात हलविले आहे. सर गंगाराम रुग्णालयाचे प्रमुख डॉ. डी.एस. राणा यांनी गुरुवारी मेडिकल बुलेटिनद्वारे ही माहिती दिली.
सोनियांच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. दुखऱ्या खांद्यावरील उपचारासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या डॉक्टरांचे एक पथक गंगाराम हॉस्पिटलमध्ये बोलविण्यात आले होते. मुंबईचे डॉक्टर संजय देसाई आणि गंगाराम हॉस्पिटलचे डॉक्टर प्रतीक गुप्ता यांचा या पथकात समावेश होता. या पथकाने सोनिया यांच्या खांद्यावर बुधवारी रात्री यशस्वी शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया दोन तास चालल्याचे सूत्रांनी सांगितले. शस्त्रक्रियेनंतर सोनिया यांना फिजियोथेरेपीची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांना आणखी काही दिवस रुग्णालयातच थांबावे लागेल, असे राणा यांनी सांगितले.

Web Title: Sonia's successful surgery on shoulder, improvement in the condition