पर्यावरणासंबंधीचा मसुदा मागे घ्या; सोनिया आणि राहुल गांधी यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 06:45 IST2020-08-14T02:33:18+5:302020-08-14T06:45:25+5:30

सोनिया गांधी म्हणाल्या की, पर्यावरणाचे संरक्षण करणे हे सरकारचे सामाजिक कर्तव्य आहे. एका लेखात त्यांनी म्हटले आहे की, पर्यावरणाचे संरक्षण आणि लोकांचे आरोग्य याला महत्त्व द्यायला हवे.

Sonia Rahul Gandhi seek withdrawal of EIA 2020 | पर्यावरणासंबंधीचा मसुदा मागे घ्या; सोनिया आणि राहुल गांधी यांची मागणी

पर्यावरणासंबंधीचा मसुदा मागे घ्या; सोनिया आणि राहुल गांधी यांची मागणी

नवी दिल्ली : देशातील सरकारने पर्यावरणाचे नियम मोडकळीस आणले असून पर्यावरण प्रभाव मूल्यांकन (ईआयए) २०२० चा मसुदा मागे घेण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी केली. तथापि, राहुल गांधी यांनीही सोनिया गांधी यांचा लेख शेअर करीत टष्ट्वीट केले आहे की, निसर्गाचे संरक्षण केले तर निसर्गही संरक्षण करतो. सरकारने पर्यावरणासंबंधी नियम मोडणे बंद करायला हवे. हा मसुदा मागे घ्यायला हवा.

सोनिया गांधी म्हणाल्या की, पर्यावरणाचे संरक्षण करणे हे सरकारचे सामाजिक कर्तव्य आहे. एका लेखात त्यांनी म्हटले आहे की, पर्यावरणाचे संरक्षण आणि लोकांचे आरोग्य याला महत्त्व द्यायला हवे.

अनियंत्रित आर्थिक विकासाच्या कल्पनेमागे धावण्याने देशाला पर्यावरण आणि लोकांचे अधिकार या दोन्हींचाही त्याग करावा लागला आहे. विकासासाठी व्यापारी घडामोडींची आवश्यकता आहे; पण यालाही काही मर्यादा हव्यात.

Web Title: Sonia Rahul Gandhi seek withdrawal of EIA 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.