सोनिया, राहुल गांधी दोन दिवस काश्मीरमध्ये, निगीन सरोवरात नौकाविहाराचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 01:59 IST2023-08-27T01:58:22+5:302023-08-27T01:59:24+5:30

दुपारी काँग्रेसचे जम्मू-कश्मीर प्रदेशाध्यक्ष वकार रसूल वाणी यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी विमानतळावर सोनिया गांधी यांचे स्वागत केले. 

Sonia, Rahul Gandhi in Kashmir for two days, enjoying boating in Lake Nigin | सोनिया, राहुल गांधी दोन दिवस काश्मीरमध्ये, निगीन सरोवरात नौकाविहाराचा आनंद

सोनिया, राहुल गांधी दोन दिवस काश्मीरमध्ये, निगीन सरोवरात नौकाविहाराचा आनंद

श्रीनगर : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी शनिवारी काश्मीर येथे खासगी  दौऱ्यासाठी श्रीनगरला पोहोचल्या. त्यांचे पुत्र राहुल गांधी हे एक दिवस आधीच लडाख दौरा आटोपून श्रीनगरात दाखल झाले आहेत.दुपारी काँग्रेसचे जम्मू-कश्मीर प्रदेशाध्यक्ष वकार रसूल वाणी यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी विमानतळावर सोनिया गांधी यांचे स्वागत केले. 

श्रीनगरला पोहोचताच सोनिया गांधी यांनी निगीन सरोवरास भेट दिली, तसेच नौकाविहाराचा आनंद लुटला. राहुल गांधी हे शुक्रवारी येथे पोहोचल्यानंतर निगीन सरोवरात एका हाउसबोटीवर थांबले आहेत. शनिवारी गांधी परिवार रैनावाडी भागातील एका हाॅटेलात थांबण्याची शक्यता आहे. त्यांची बहीण प्रियांका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वाद्रा हेही येथे पोहोचण्याची शक्यता आहे. 

संपूर्ण परिवार रविवारी गुलमर्गला भेट देणार आहे. एका काँग्रेस नेत्याने सांगितले की, हा गांधी परिवाराचा व्यक्तिगत दौरा असून या दरम्यान काेणताही राजकीय कार्यक्रम निर्धारित करण्यात आलेला नाही.

Web Title: Sonia, Rahul Gandhi in Kashmir for two days, enjoying boating in Lake Nigin