शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधींची  निवृत्ती राजकारणातून नाही, केवळ अध्यक्षपदावरून - काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 16:47 IST

सोनिया गांधी यांनी संसद भवन परिसरात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. मात्र सोनिया गांधी या केवळ काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहेत. त्यांनी राजकारणातून निवृत्ती स्वीकारलेली नाही, असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

नवी दिल्ली - सोनिया गांधी यांनी संसद भवन परिसरात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. मात्र सोनिया गांधी या केवळ काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहेत. त्यांनी राजकारणातून निवृत्ती स्वीकारलेली नाही, असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी सोनिया गांधी संसदेत आल्या होत्या त्यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना आपण आता निवृत्त होणार असल्याचे म्हटले होते. तेव्हापासून सोनिया गांधी यांनी राजकीय जीवनातून निवृत्त होत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकू लागले होते. मात्र काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत सोनिया गांधीच्या राजकीय निवृत्तीचे वृत्त तातडीने फेटाळून लावले. "सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती स्वीकारली आहे, राजकारणातून नाही. त्यांचे आशीर्वाद, अनुभव आणि वचनबद्धता काँग्रेससाठी नेहमीच मार्गदर्शक ठरतील." असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे.   संसदेच्या हिवाळी अधिकवेशनासाठी सोनिया गांधी संसदेत उपस्थित राहिल्या होत्या त्यावेळी संसद भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदावरून निवृत्तीबाबत भाष्य केले होते. मात्र प्रसारमाध्यमांमध्ये सोनिया गांधींच्या राजकीय निवृत्तीचे वृत्त प्रसारित झाले होते.  सर्वाधिक काळ काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा पुत्र राहुल गांधी यांच्या हाती सोपवण्याच निर्णय नुकताच घेतला होता. यापूर्वी या घरातील मोतिलाल नेहरू, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. आता सोनिया गांधी यांच्यानंतर अध्यक्ष होणार ते घरातील सहावे अध्यक्ष असतील. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसने देशभरात सुमारे 50 वर्षांहून अधिक काळ राज्य केले होते. मात्र भाजपाचा प्रभाव वाढू लागल्यापासून काँग्रेसच्या विस्ताराला खीळ बसली होती. एकेकाळी संपूर्ण देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसची सध्या केवळ 5 राज्यांमध्ये  आणि पुद्दुचेरी या केंद्रशासीत प्रदेशावर सत्ता आहे. त्यामुळे नव्याने अध्यक्ष होत असलेल्या राहुल गांधीसमोर काँग्रेसचा दुरावलेला जनाधार परत मिळवून देण्याचे आव्हान असेल.   

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसIndiaभारत