शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधी आता बदलणार पक्षाचा चेहरा; असंतुष्टांना आरसा दाखवल्यानंतर पुढचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 06:17 IST

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत असंतुष्टांना आरसा दाखविल्यानंतर अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आता काँग्रेसचा चेहरा बदलण्याच्या कामाला लागल्या आहेत.

- शीलेश शर्मानवी दिल्ली :  काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत असंतुष्टांना आरसा दाखविल्यानंतर अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आता काँग्रेसचा चेहरा बदलण्याच्या कामाला लागल्या आहेत. पुढल्या वर्षी होणाऱ्या काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीआधीच  राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याचा मार्ग प्रशस्त करण्याचे त्यांनी ठरविले आहे. काँग्रेसच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने संकेत दिले की, त्यासाठी  त्यांनी राष्ट्रीयस्तरापासून ते जिल्हास्तरांवरील युवा चेहऱ्यांना पुढे आणण्याची रणनीतीही ठरविली आहे.अलीकडेच विविध राज्यांतील संघटनात्मक फेरबदल करताना अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला असून हे नवीन चेहरे राहुल यांच्या पसंतीचे असल्याचे सांगितले जाते. काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीआधी त्या प्रत्येक महत्त्वाच्या पदावर राहुल यांच्या निष्ठावतांची  नियुक्ती करतील. तसेच नवीन सरचिटणीसांच्या नियुक्त्याही त्यांच्या विषयपत्रिकेवर आहे. त्यांची ही मोहीम किती यशस्वी ठरते, हे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाबमधील विधानसभा निवडणूक निकालातून निश्चित होईल. या राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी चांगली राहिली तर, राहुल गांधी पुन्हा अध्यक्ष होणे निश्चित आहे. प्राप्त संकेतानुसार संघटनात्मक निवडणुकीपूर्वी सोनिया गांधी गुलाम नबी आझाद यांनाही महत्त्वाचे पद देऊन हा गट (जी-२३)  खिळखिळा करतील.  १९९९ मध्ये सोनिया गांधी  यांच्याविरुद्ध  अध्यक्षपदासाठी जितेंद्र प्रसाद  मैदानात उतरले होते. त्याचप्रमाणे अंसतुष्ट गटाने राहुल गांधी यांच्याविरुद्ध एखाद्या नेता उभा केल्यास राहुल आपल्याविरोधातील उमेदवाराला पराभूत करण्यास यशस्वी होतील. कारण तोपर्यंत  सर्व महत्त्वपूर्णपदांवर निष्ठावंताची नियुक्ती  झालेली असेल. कार्यकारिणीच्या निवडणुकीतही राहुुल आणि सोनिया यांच्या पाठिंब्यावर ज्यांना मैदानात उतरविले जाईल, त्यांना विजयी करण्यासाठी अगोदरच त्यांना मतदान करणारे पक्षाचे प्रतिनिधी गांधी परिवाराच्या पसंतीचे असतील. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट सांगितले आहे की, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत काँग्रेसचा कार्यकर्ता राहुल गांधी यांना पुन्हा काँग्रेस अध्यक्षपदावर पाहण्यास उत्सुक आहे. दुसरीकडे ए. के. ॲन्टोनी, हरिश रावत, अशोक गेहलोत यांच्यासह अन्य वरिष्ठ नेतेही राहुल  गांधी यांच्या हाती काँग्रेसची धुरा सोपविण्यात यावी म्हणून आग्रही आहेत. जी-२३ सूमहातील नेत्यांकडे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल यांच्याविरोधात उतरविण्यासारखा एकही नेता नाही.विशेष म्हणजे अंसतुष्टांच्या गोटात फूट पडल्याने आनंद शर्मा, कपिल सिब्बल, विवेक तन्खा यांच्यासारखे नेते एकाकी पडल्याचे दिसते. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस