शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

PM Modi Security Breach : पंतप्रधान संपूर्ण देशाचे, जे कुणी जबाबदार असतील...; सोनिया गांधींचा मुख्यमंत्री चन्नींना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 19:44 IST

यावेळी सोनिया म्हणाल्या, पंतप्रधान संपूर्ण देशाचे आहेत. चन्नी यांनीही सोनिया गांधींना घटनेची संपूर्ण माहिती दिली आणि आपण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचेही सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण चांगलेच तापताना दिसत आहे. एकीकडे भाजप पंजाबमधील चन्नी सरकारवर हल्ले चढवत आहे, तर दुसरीकडे सीएम चन्नी सुरक्षेत चूक झालीच नसल्याचे म्हणत आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्याशी संपर्क साधला. यात त्यांनी, या संपूर्ण घटनेस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत काँग्रेस हायकमांडने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली आहे. यावेळी सोनिया गांधी यांनी सीएम चन्नींना, पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात संपूर्ण काळजी घ्यायला हवी, असे सांगितले. तसेच झालेल्या घटनेस जे कुणी जबाबदार असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असेही म्हटले आहे.

यावेळी सोनिया म्हणाल्या, पंतप्रधान संपूर्ण देशाचे आहेत. चन्नी यांनीही सोनिया गांधींना घटनेची संपूर्ण माहिती दिली आणि आपण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचेही सांगितले.

एका हिंदी वृत्त संस्थेशी बोलताना मुख्यमंत्री चन्नी म्हणाले,  पंतप्रधानांच्या कार्यक्रमात शेवटच्या क्षणी अचानक बदल झाला. पंतप्रधानांना हेलिकॉप्टरने जायचे होते. मात्र त्यांनी अचानकच रस्त्याने जाण्याचे ठरवले. यात पोलिसांची चुकी नाही. तसेच, आंदोलक ज्या ठिकाणी रस्ता रोखून बसले होते, तेथपासून पंतप्रधानांचा ताफा एक किलोमीटर आधीच थांबवण्यात आला होता. मग यात धोका कसला?

मुख्यमंत्री चन्नींकडून पंजाब पोलिसांचा बचाव - मुख्यमंत्री चन्नी पंजाब पोलिसांचा बचाव करताना म्हणाले, पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी, हे केंद्रीय संस्था इंटेलिजन्स ब्युरो आणि एसपीजीचे अपयश आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी आयबीच्या संचालकांनीही सुरक्षा व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. परंतु अचानक सकाळी 10-12 जण जवळच्या गावातून आले आणि रस्त्यात बसले होते. याशिवाय पंतप्रधान मोदी ज्या ठिकाणी येणार होते, तो भाग मुळातच बीएसएफच्या अखत्यारीत येते, यामुळे यात राज्य पोलिसांची कसलीही चूक नाही.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीPunjabपंजाबNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस