शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

‘सोनिया गांधींचा देशासाठी त्याग, राहुल गांधींचे विचार साईबाबांप्रमाणे’; शिर्डीत रॉबर्ट वाड्रांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 9:07 AM

रॉबर्ट वाड्रा रविवारी शिर्डीतील श्री साईबाबा मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी आले होते.

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांनी रविवारी मोठं वक्तव्य केलं. त्यांनी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांची तुलना शिर्डीच्यासाईबाबांशी केली. यासोबतच त्यांनी भारत जोडो यात्रेचंही कौतुक केलं. भारत जोडो यात्रेमुळे देशात एक बदल पाहायला मिळेल. हजारो लोक याच्याशी जोडले जात आहेत आणि राहुल गांधींकडे भविष्य म्हणून पाहत आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं.

रॉबर्ड वाड्रा रविवारी शिर्डीतील श्री साईबाबा मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी आले होते. यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं. “राहुल गांधी यांचे विचार साईबाबा यांच्याप्रमाणेच आहेत. त्यांनी एकतेचा प्रचार केला होता,” असं ते म्हणाले. दरम्यान, वाड्रा यांनी यावर सविस्तर भाष्य केलं नाही.

'साईबाबांचा आशीर्वाद मिळेल'“सध्या आपला देश मोठ्या संकटाचा सामना करत आहोत. राहुल गांधी यांचे विचार साईबाबा यांच्याप्रमाणेच आहेत. त्यांना साईबाबांचे आशीर्वाद मिळतील अशी अपेक्षा आहे. राहुल गांधी अनेक ठिकाणी जात आहेत आणि हजारो लोकांची भेट घेत आहेत. मोठ्या प्रमाणात लोक त्यांच्याशी जोडले जात आहेत. भविष्यात नक्कीच बदल दिसून येतील कारण राहुल गांधी लोकांसाठी नवी आशा आहेत,” असंही वाड्रा यांनी नमूद केल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं.

'लोकांचं प्रेम मिळतंय'“भाजप आमच्या कमतरतांबद्दल चर्चा करेल. पक्षाची खिल्लीही उडवतील. परंतु राहुल गांधी आणि प्रियांका गांधी थांबणार नाहीत. ते लोकांमध्येच राहतील. त्यांच्यासाठी एकत्र येऊनच काम करतील. गांधी कुटुंबीयांना अपार प्रेम मिळत आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी त्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याच्या विचारात असलेल्यांनाही इशारा दिला. ज्यांना पक्ष सोडायचा आहे ते जाऊ शकतात. परंतु जे थांबतील ते सोनिया गांधींचा त्याग आणि राहुल, प्रियांका यांचे प्रयत्न समजून घेतील, असं म्हटलं.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीrobert vadraरॉबर्ट वाड्राsaibabaसाईबाबाshirdiशिर्डी