शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वेगळ्या काश्मीरची मागणी करणाऱ्या संघटनेशी सोनिया गांधींचा संबंध; भाजपच्या आरोपांनी खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 09:26 IST

जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंधित संस्थेशी सोनिया गांधींचेही संबंध असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

Sonia Gandhi : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याचे विचार मांडणाऱ्या संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप भाजपने  केला आहे. फोरम ऑफ डेमोक्रॅटिक लीडर्स इन एशिया पॅसिफिक असे या संघटनेचे नाव आहे आणि सोनिया गांधी त्याच्या सह-अध्यक्ष आहेत, असं  भाजपने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे. त्यामुळे आता या आरोपांवरुन काँग्रेसकडून जोरदार टीका होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, संसदेच्या अधिवेशनातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

भाजपन काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर जॉर्ज सोरोस फाऊंडेशनशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. परकीय शक्ती भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये कसा हस्तक्षेप करत आहेत, हे या सहकार्यातून दिसून येते, असे भाजपने म्हटले आहे. भाजप ज्या संस्थेचे नाव घेतलं आहे त्या संस्थेला फाउंडेशनकडून काश्मीर भारतापासून वेगळे करण्याच्या कल्पनेला समर्थन देणाऱ्या संघटनेला मदत मिळते.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा एफडीएल-एपी फाऊंडेशनच्या सह-अध्यक्ष या नात्याने जॉर्ज सोरोस फाऊंडेशनशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही संघटना काश्मीरला वेगळा स्वतंत्र देश मानते, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. देशातील सर्वात जुना पक्ष देशालाच तोडणाऱ्या विचारसरणीशी संबंधित असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित होते. हे भारताच्या अंतर्गत बाबींवर परकीय घटकांचा प्रभाव आणि अशा संबंधांचा राजकीय प्रभाव देखील दर्शवते, असंही भाजपने म्हटलं आहे.

"काँग्रेसच्या राजीव गांधी फाऊंडेशनलाही जॉर्ज सोरोस फाऊंडेशनकडून निधी मिळाला आहे. हा फंडा भारताची बदनामी करण्यासाठी वापरला जात आहे. राहुल गांधी अनेकवेळा ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टच्या अहवालाचा हवाला देऊन केंद्र सरकारवर हल्ला करतात. ओसीसीआरपीला जॉर्ज सोरोसकडून निधी मिळतो. हे दोघेही काँग्रेससह भारताची अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचा आणि मोदी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत," असे दोन आरोप करण्यात आले आहेत.

दरम्यान, अमेरिकेने भारतीय उद्योगपती अदानी यांच्यावर केलेल्या आरोपांवरुन काँग्रेसने सरकारवर टीका केली होती. त्यावरूनही भाजपने राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. अदानी मुद्द्यावर राहुल गांधी यांनी घेतलेली पत्रकार परिषद जॉर्ज सोरोस यांच्या निधीतून चालवलेल्या संस्थेने थेट दाखविल्याचे भाजपने म्हटले आहे. यावरून काँग्रेस आणि जॉर्ज सोरोस यांच्यातील संबंध किती घट्ट आहेत आणि भारतासाठी किती धोकादायक आहेत हे दिसून येते. भारताची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी ते किती उत्सुक आहे हे यावरून दिसून येते. इतकेच नाही तर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी जॉर्ज सोरोस यांना त्यांचे जुने मित्रही म्हटले आहे, असा आरोप भाजपने केला. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस