सोनिया गांधी नियमित वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 05:50 IST2020-09-13T05:50:08+5:302020-09-13T05:50:30+5:30

राहुल गांधी हे आठवडाभरात परतण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी पंधरवड्यात परतण्याची शक्यता असून, त्यानंतर त्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.

Sonia Gandhi leaves for US for regular medical check up | सोनिया गांधी नियमित वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेकडे रवाना

सोनिया गांधी नियमित वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेकडे रवाना

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी नियमित वैद्यकीय तपासणीसाठी शनिवारी अमेरिकेकडे रवाना झाल्या. त्यांच्यासमवेत त्यांचे पुत्र राहुल गांधी आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राहुल गांधी हे आठवडाभरात परतण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी पंधरवड्यात परतण्याची शक्यता असून, त्यानंतर त्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. सोनिया गांधी यांची वैद्यकीय तपासणी यापूर्वीच करण्यात येणार होती; परंतु कोरोनाच्या उद्रेकानंतर उद्भवलेल्या स्थितीमुळे ती आता करण्यात येत आहे, अशी माहिती काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.

Web Title: Sonia Gandhi leaves for US for regular medical check up