शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधी अडचणीत, राष्ट्रपतींना बिचारे म्हणणे भोवणार; संसदेत विशेषाधिकार भंगाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 20:15 IST

दोन्ही नेत्यांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोनिया गांधींच्या या टिप्पणीवरून भाजपाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना पत्र लिहिले आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाष्य करताना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी द्रौपदी मुर्मूंना 'पुअर लेडी' म्हटले होते. यावरून आता सोनियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी सोमवारी काँग्रेसच्या राज्यसभा सदस्या सोनिया गांधी आणि खासदार पप्पू यादव यांच्याविरुद्ध संसदेच्या विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली आहे. 

दोन्ही नेत्यांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोनिया गांधींच्या या टिप्पणीवरून भाजपाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये राष्ट्रपतींच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारच्या टिप्पण्या राष्ट्रपतींच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवतात. या टिप्पण्या आदिवासींच्या प्रतिष्ठेशी देखील जोडल्या गेल्या आहेत आणि दोन्ही नेत्यांवर आदिवासी विरोधी मानसिकता असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सोनिया गांधी यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असल्याचे प्रियंका गांधी यांचे म्हणणे आहे. त्या ७८ वर्षांच्या महिला आहेत आणि त्या राष्ट्रपतींचा अपमान करणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. 

नेमके प्रकरण काय... बिचाऱ्या राष्ट्रपती, त्या खूप थकलेल्या दिसत होत्या, अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी दिली होती. यावर तेव्हाच राष्ट्रपती भवनाकडून प्रतिक्रिया आली होती. सोनिया गांधी यांनी केलेले विधान दुर्दैवी आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात करण्यासाठी तासभर चाललेल्या भाषणादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  कुठेही थकल्या नव्हत्या, असं राष्ट्रपती भवनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांच्या टिप्पण्यांमुळे एका उच्चपदस्थांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. अशा टिप्पण्या दुर्दैवी असून पूर्णपणे टाळता येण्यासारख्या आहेत, असं राष्ट्रपती भवनाने म्हटले होते.  

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूBudget 2025अर्थसंकल्प २०२५