शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधी नाराज आमदारांसमोर तयारीनिशी आल्या, ५ पैकी एका प्रश्नावर ठरणार ठाकरे सरकारचे भविष्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 13:14 IST

काँग्रेसच्या महाराष्ट्रातील आमदारांची पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली. या बैठकीत काँग्रेसचे जवळपास २० आमदार उपस्थित होते.

नवी दिल्ली-

काँग्रेसच्या महाराष्ट्रातील आमदारांची पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली. या बैठकीत काँग्रेसचे जवळपास २० आमदार उपस्थित होते. महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रासाठी काँग्रेसनं दुसऱ्यांदा परंपरा मोडली असं म्हणता येईल कारण तीन वर्षांपूर्वी हिंदुत्ववादी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करुन काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला होता. आता काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये प्रभारी किंवा प्रदेशाध्यक्षांशिवाय थेट हायकमांडसोबत आमदारांची बैठक ही दुर्मिळ गोष्ट आहे. राहुल गांधी देखील या आमदारांना भेटणार आहेत. 

काँग्रेसच्या नाराज आमदारांकडून सोनिया गांधी यांनी खूप महत्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या. यावेळी सोनिया गांधी देखील बैठकीत संपूर्ण तयारीनिशी आल्या होत्या. नाराज आमदारांचं म्हणणं सोनियांनी नीट लक्ष देऊन ऐकून घेतलंच पण त्यांनी आमदारांकडून पाच प्रश्नांमधून राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराबाबत महत्वाची माहिती जाणून घेतली. सोनियांनी आमदारांना विचारलेल्या पाच पैकी एक प्रश्न लक्षवेधी आणि महत्वाचा ठरणारा आहे. सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या नाराज आमदारांना राज्याच्या कॅबिनेटमध्ये किमान समान कार्यक्रमाला किती प्राधान्य दिलं जातं? असा थेट प्रश्न विचारला. त्यावर काँग्रेसच्या आमदारांचं मत जाणून घेतलं. सोनियांचा हा प्रश्न राज्यातील महाविकास आघाडीचं भवितव्य ठरवणारा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 

तुमचं म्हणणं बेधडकपणे मांडा...सोनिया गांधी यांनी यावेळी काँग्रेस आमदारांना तुमचं म्हणणं स्पष्टपणे मांडा. मनात काही ठेवू नका, असं दोन-तीनवेळा आमदारांना म्हटलं. त्यानंतर आमदारांनी त्यांचं संपूर्ण मत सोनियांकडे व्यक्त केलं असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे मंत्री आमदारांना विश्वासात घेत नाहीत. विकास कामांबाबत विचारत नाही. पालकमंत्री पक्ष संघटनेला महत्व देत नाहीत. काही मंत्र्यांचा तोरा वाढला असून जनतेशी वागणूकही बदलली आहे. अशा मंत्र्यांना एकतर पदावरून दूर करा किंवा त्यांचे परफॉर्मन्स ऑडिट करा, अशी मागणी करीत आमदारांनी सोनिया गांधी यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला. आपल्या तक्रारींची दखल घेतली जाईल, असं सोनिया गांधी यांनी आमदारांना आश्वस्त केलं.

सोनिया गांधींनी नाराज आमदारांना विचारलेले ५ महत्वाचे प्रश्न पुढीलप्रमाणे..१. आमदारांची बैठक होते का?२. प्रत्येक मंत्र्यामागे त्या जिल्ह्याचे किती आमदार आहेत?३. संघटक आणि मंत्री यांच्यात किती ताळमेळ आहे?४. राज्याच्या कॅबिनेटमध्ये किमान समान कार्यक्रमाला किती प्राधान्य दिलं जातं?५. मंत्री कॅबिनेट बैठकीआधी प्रदेशाध्यक्ष आणि आमदारांचे प्रश्न समजून घेतात का?

सोनिया गांधी यांनी वरील पाच प्रश्नांमधून काँग्रेसच्या नाराज आमदारांकडून राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली आहे. तसंच नाराज आमदारांच्या मागण्यांवर कार्यवाही केली जाईल असं आश्वासन आमदारांना देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी देखील या आमदारांना भेटणार आहेत. काँग्रेसला पंजाबमध्ये बसलेला मोठा फटका लक्षात घेता महाराष्ट्रातील पक्ष व्यवस्थापनाकडे हायकमांडनं आता अधिक लक्ष दिल्याचे हे संकेत असल्याचं म्हटलं जात आहे. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे