शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीच्या हत्येनंतर १४ दिवस घराजवळच लपून बसली होती सोनम; प्रियकर राज रोज भेटायचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:19 IST

Sonam Raghuwanshi Case: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सोनमने पतीला संपवण्यासाठी मजबूत तयारी केली होती.

Raja Raghuwanshi Murder Case: मेघालयात हत्या झालेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. राजाची पत्नी सोनम रघुवंशी हिनेच प्रियकरासह मिळून त्याची हत्या केली. राजाच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह दरीत फेकण्यात आला होता. मृतदेह सापडल्यापासून सोनम बेपत्ता होती. तब्बल १७ दिवस गायब असलेली सोनम पोलिसांना उत्तर प्रदेशातील एका ढाब्यावर सापडली. पोलिसांच्या चौकशीत सोनम हत्येनंतर पुन्हा मध्य प्रदेशात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १४ दिवस सोनम इंदौरमध्ये एका घरात राहत होती.

हनिमूसाठी मेघालयात जाऊन पती राजा रघुवंशीची हत्या करणाऱ्या सोनमने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मेघालय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहासह मिळून राजाला संपवले. पोलिसांसमोरच सोनमने सांगितले की तिने तिच्या पतीला मारण्याचा कट रचला होता. राजाला मारण्यासाठी, सोनमने राज कुशवाहाला ५०,००० रुपये दिले होते. त्या पैशातून राजसह विशाल सिंग, आनंद कुर्मी आणि आकाश राजपूत हे शिलाँगला गेले आणि तिच्यावर लक्ष ठेवू लागले.

राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनम इंदौरला परत आली होती. तिने एक फ्लॅट भाड्याने घेतला होता आणि त्यात ती १४ दिवस लपून राहिली होती. सोनमला माहित होते की राजाच्या हत्येनंतर तिला लपून राहावे लागेल. म्हणूनच तिने महिनाभरापूर्वीच इंदौरमध्ये हा फ्लॅट भाड्याने घेतला होता. इंदौरमध्ये राहत असताना राज कुशवाहा सोनमला नियमितपणे भेटायला जायचा. सोनमला भेटल्यानंतर तो तिच्या वडिलांच्या प्लायवूड कारखान्यात जायचा आणि त्यामुळे त्याला ऑफिसला पोहोचण्यास उशीर व्हायचा. सोनमचा भाऊ गोविंद याने राजला उशीरा येण्याचे कारणही विचारले होते.

लपून बसलेली सोनम बंद खोलीत टीव्ही चालू करून राजाशी संबंधित बातम्या पाहत होती. ती एकदाही फ्लॅटमधून बाहेर पडली नाही आणि पती राजाशी संबंधित प्रत्येक बातमी पाहत होती. राज कुशवाहाने दुसऱ्याच्या नावाने ऑनलाइन ऑर्डर देऊन तिच्यासाठी एका महिन्याचे रेशन फ्लॅटमध्ये पाठवले होते. १४ दिवसांनी सोनम उत्तर प्रदेशातील रामपूरला रवाना झाली. राज कुशवाह हा मूळचा रामपूरचा आहे. राजाच्या हत्येच्या संदर्भात काही पुरावे सापडल्याचे सोनमला कळल्यानंतर तिने इंदौर सोडले. 

दरम्यान, सोनम जेव्हा राजासोबत हनिमूनला गेली होती तेव्हा ती प्रियकर राज याच्या सतत संपर्कात होती. राजाच्या नजरेतून वाचण्यासाठी तिने तिच्या मोबाईलवर चॅटिंगसाठी काही खास आणि वेगळे अॅप्स डाउनलोड केले होते. तिन्ही कॉन्ट्रॅक्ट किलर जवळ राहावेत म्हणून ती सतत तिचे लोकेशन शेअर करत होती. लग्नाच्या काही दिवस आधीच सोनम आणि राजने राजाला संपवण्यासाठी मोठी तयारी केली होती. ऑनलाइन व्यवहार टाळण्यासाठी तिने ९ लाख रुपये सोबत घेतले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस