शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 16:32 IST

Raja Raghuvanshi : शिलाँगमध्ये बेपत्ता झालेल्या कपल प्रकरणात नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. राजाचा मृतदेह सापडला पण सोनम अजुनही बेपत्ता आहे.

शिलाँगमध्ये बेपत्ता झालेल्या कपल प्रकरणात नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. राजाचा मृतदेह सापडला पण सोनम अजुनही बेपत्ता आहे. सोनमचे वडील देवी सिंह रघुवंशी यांनी आता त्यांच्या मुलीच्या सुरक्षेसाठी आध्यात्मिक उपायांचा अवलंब केला आहे. देवी सिंह यांनी मुलीचा फोटो घराबाहेर उलटा लटकवला आहे. ज्योतिषाचा सल्ला घेतल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. त्यांना आशा आहे की, या उपायाने त्यांची मुलगी सुरक्षितपणे घरी परतेल.

देवी सिंह यांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. "मुलगा गेला आहे. आता फक्त चमत्कारच मुलीला वाचवू शकतो. संपूर्ण कुटुंबाच्या आशा आता देवावर आणि मुलीच्या नशिबावर आहेत. मुलगी आणि जावई २१ मे रोजी कोणालाही न सांगता फिरायला गेले होते. मी ज्योतिषाचा सल्ला घेतला होता आणि ५ जूनचा शुभ मुहूर्त मिळाला होता. मुलांनी कोणालाही न सांगता हनिमूनचं प्लॅनिंग केलं होतं."

नवा ट्विस्ट! राजा-सोनम हनिमूनसाठी शिलाँगला जाणारच नव्हते, अचानक का बदलला प्लॅन?

"माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी

"सोनमकडे दागिने आणि रोख रक्कम होती"

"२१ मे रोजी सकाळी राजा सोनमला सोबत घेऊन जात असल्याचं समजलं. ते कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार असल्याचं सांगण्यात आलं, त्यानंतर ते शिलाँगला पोहोचले. सोनमकडे दागिने आणि रोख रक्कम होती. ती मंगळसूत्र, चेन, अंगठी असे दागिने घेऊन प्रवासाला निघाली होती. कोणाचा तरी वाईट हेतू असावा. कामाख्या देवी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने जोडप्याला शिलाँगला जाण्याचा सल्ला दिला" असं सोनमच्या वडिलांनी म्हटलं आहे.  

सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या

सोनमचे वडील देवी सिंह रघुवंशी यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला आहे की, त्यांचा मुलगा गोविंदला शिलाँगमध्ये धमक्या दिल्या जात आहेत. स्थानिक प्रशासन सहकार्य करत नाही. आम्ही त्याच्या सुरक्षेसाठी येथून लोक पाठवले आहेत. तसेच राजा आणि सोनमचा तिथल्या कॅफे ऑपरेटरशी वाद झाल्याचाही कुटुंबाला संशय आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी